घरमनोरंजनThackeray Trailer : 'ही' शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही

Thackeray Trailer : ‘ही’ शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही

Subscribe

बाळा लोकरेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असून, शिवसेनेने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या २५ जानेवारीला ‘ठाकरे’ चित्रपटाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. मात्र, त्यावर ‘ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसून हे एका शिवसैनिकाचं खासगी मत आहे’, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ‘२५ जानेवारीला ठाकरे चित्रपटाशिवाय अन्य कोणताच चित्रपटप्रदर्शित होऊ देणार नाही’, अशा शब्दात लोकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केली होती. यावरच खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. बाळा लोकरेंनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं खासगी मत असून, शिवसेना पक्षाने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सुरुवातीपासूनच काही ना काही कॉन्ट्रव्हर्सीजमध्ये अडकलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर आता चित्रपटाच्या रिलीज डेटवरुन पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

२५ जानेवारी २०१९ रोजी ‘ठाकरे’ चित्रपटासोबतच अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणकर्णिका’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. तर दुसरीकडे याच तारखेला इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला ‘चीट इंडिया’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

- Advertisement -

काल (बुधवारी) बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर  लाँच करण्यात आला. आता तमात शिवसैनिक आणि बाळसाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांना उत्सुकता आहे ती ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दकीने चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंचं पात्र साकारलं आहे. अनेकांनी चित्रपटातील नवाजच्या लूकचं कौतुक केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -