सारा अली खानने ‘असा’ साजरा केला सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस

21 जानेवारी रोजी दिवंगत अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस होता. याचं निमित्ताने त्याच्या कुटुंबीयांसोबतच त्याचे चाहते मित्र-मैत्रिणी सर्वांनी त्याची पुन्हा आठवण काढली. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने देखील सुशांतला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, सोबतच त्याचा वाढदिवस देखील साजरा केला. साराने सामाजिक संस्थेतील मुलांसोबत सुशांतचा वाढदिवस साजरा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

शनिवारी सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात सारा एका सामाजिक संस्थेतील मुलांसोबत सुशांतच्या वाढदिवसाचा केक कापत आहे. या व्हिडीओखाली साराने लिहिलंय की, “हॅप्पी बर्थडे सुशांत…मला ठाऊक आहे की, दुसऱ्यांच हसणं तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे आणि जेव्हा तू आम्हा सर्वांना पाहतोस वर उगवत्या चंद्राच्या बाजूला, मला आशा आहे की तू आम्हाला पाहून आनंदाने हसत असशील. शाइन ऑन, जय भोलेनाथ…!”

सामाजिक संस्ठेचे मानले आभार
सारा ने पुढे लिहिलं की, “आजचा दिवस खास करण्यासाठी @sunilarora_ @balashatrust यांना धन्यवाद. तुमच्या सारखे लोक जगाला सुंदर, सुरक्षित, आनंदी बनवतात. तुम्ही असाच आनंद पसरवत राहा.”

साराची ही पोस्ट पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. अनेकजण साराचं खूप कौतुक करत आहेत.

 


हेही वाचा :

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन