Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'अवतार 2' ठरला भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट

‘अवतार 2’ ठरला भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट

Subscribe

हॉलिवूडचा बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला असून जवळपास महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जादू कायम आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. अजूनही प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 368.20 कोटींची कमाई केली आहे.

‘अवतार 2’ ठरला भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट

- Advertisement -

16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अवतार 2’ ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापासूनच इतिहास रचायला सुरुवात केली असून भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. अवतार 2 ने भारतात 368.20 कोटींची कमाई करत ‘अवतार’च्या पहिल्या पार्टला देखील मागे टाकले आहे.

भारतात 6 भाषांमध्ये झाला प्रदर्शित
हा चित्रपट भारतामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलूगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

- Advertisement -

‘अवतार 2’ ठरला जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट सहावा चित्रपट

जगभरातील टॉप चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर 2009 प्रदर्शित झालेला ‘अवतार’ चित्रपट आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 2.9 बिलियन डॉलर कमाई केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘एवेंजर्स एंडगेम’ चित्रपटाने 2.7 बिलियन डॉलर कमावले होते. तिसऱ्या क्रमांकावर ‘टायटॅनिक’ चित्रपट आहे ज्याने 2.1 बिलियन डॉलर कमावले होते. तर चौथ्या स्थानावर 2.069 बिलियन डॉलर कमावणारा ‘स्टार वार्स- द फोर्स अवेकंस’ चित्रपट आहे. पाचव्या क्रमांकावर ‘एवेंजर्स इनफिनिटी वॉर’ चित्रपट आहे ज्याने 2.048 बिलियन डॉलर कमावले होते. तर सहाव्या क्रमांकावर महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’हा चित्रपट आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरातून एकूण 1.9 बिलियन डॉलर कमावले आहेत.


हेही वाचा :

सारा अली खानने ‘असा’ साजरा केला सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -