Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन साराने केला ऑटोने प्रवास नेटकरी म्हणाले... 'स्वस्तातलं प्रमोशन'

साराने केला ऑटोने प्रवास नेटकरी म्हणाले… ‘स्वस्तातलं प्रमोशन’

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटासाठी सारा जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच, साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सारा ऑटोमधून प्रवास करताना दिसत आहे. साराच्या स्वभावातील हा साधेपणा नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करतो. साराचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत.

सारा करतेय ऑटोने प्रवास

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सैफ अली खानसारख्या मोठ्या अभिनेत्या मुलगी सारा अली खान नेहमीच तिच्या साधेपणामुळे चर्चेत असते. सध्या सारा तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. अशातच, सध्या सोशल मीडियावर साराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सारा ऑटोमधून प्रवास करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

- Advertisement -

साराचा हा ऑटोतील व्हिडीओ पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. तर अनेकजण तिला ट्रोल देखील करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलंय की, ‘ऑटो ड्रायव्हरला पैसे कोण देणार?’ तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘हा स्वस्त पब्लिसिटी स्टंट आहे.’ असे नेटकरी म्हणाले.

 ‘जरा हटके जरा बचके’  2 जूनला होणार प्रदर्शित

विक्की कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विक्की आणि सारा यात मुख्य भूमिका साकारत आहेत. यात विक्की कौशल कपिल ही भूमिका साकारत आहे. तर सारा अली खान सौम्या ही भूमिका साकारणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचा नंबर सोशल मीडियावर लीक

- Advertisment -