घरमनोरंजनSay No To Drugs : आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी

Say No To Drugs : आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील मोठे ड्रग्ज रॅकेट समोर आले होते. याप्रकरणात अनेक बॅलिवूड सेलिब्रिटींना अटक करण्यात आली. हे प्रकरण शांत होत नाही तोवर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एनसीबीने अटक केली. एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला. यावेळी आर्यन खानसह एकूण १६ जणांना एनसीबीने आत्तापर्यंत ताब्यात घेतले आहे. सध्या एनसीबी याप्रकरणात कसून चौकशी करत आहे.

ड्रग्ज प्रकरणात आता शाहरुखच्या मुलाचे नाव आल्याने अनेकांकडून ‘बॉलिवूड ड्रग्जचा अड्डा’ असल्याची टीका करत आहेत. सोशल मीडियावरही रंगत असणाऱ्या या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी उडी घेतली आहे. सुभाष घई यांनी आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी दिली आहे. घई यांनी बॉलिवूडमधील अमली पदार्थविरोधात मोहिमेत सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

- Advertisement -
After Aryan Khan's arrest, Subhash Ghai recalls Bollywood's anti-drug campaign in 1990
Say No To Drugs : आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी

सुभाष घई यांनी त्यांच्या कू अॅपवर हा जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात अभिनेता आमिर खान, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, अभिनेत्री शबाना आझमी, डिंपल कपाडिया यांसह अनेक कलाकार दिसत आहेत.
सुभाष यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “१९९० साली मीडियाच्या माध्यमातून आम्ही #SayNoToDrugs ही मोहीम सुरू केली होती. यात गुलशन जितेंदर, विनोद खन्ना, आमिर खान, अमिताभ बच्चन, मिथुन दा, जॅकी, डिंपल, शबाना, टीना खन्ना, पद्मिनी कोल्हापुरे आणि व्हीआयपी यांच्यासह अनेक कलाकारांना सहभाग घेतला होता. आम्ही आजही ड्रग्ज या रक्षसाच्या विरोधात लढत आहोत. देव आमच्या मुलांना या राक्षसापासून वाचवू दे”.

या पोस्टच्या माध्यामातून त्यांनी जाहीरपणे बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाला विरोध दर्शवला आहे. ड्रग्जविरोधातील बॉलिवूडमधील ही ३१ वर्षे जुनी मोहिम आहे. सध्या आर्यन खान एनसीबी कोठडीत आहे. यावर शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीस आर्यन खान आणि शाहरुखनच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. चित्रा कृष्णमूर्ती, पूजा भट्ट, हंसल मेहता, सुझान खान यांनी आर्यन खानच्या अटेकावर निषेध व्यक्त केला आहे. तर अनेकांनी याला पाठींबा दर्शवला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -