घरमनोरंजन'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेचा प्रोमो लाँच; नात्यांच्या डोहात प्रेम...

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिकेचा प्रोमो लाँच; नात्यांच्या डोहात प्रेम की दुरावा?

Subscribe

देव आणि सोनाक्षी या पडद्यावरच्या लोकप्रिय जोडप्याच्या माध्यमातून प्रेक्षकांशी मजबूत भावबंध यशस्वीरित्या जोडल्यानंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आता कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी द्वारे एक नवी गोष्ट प्रस्तुत करत आहे. वैविध्यपूर्ण, दर्जेदार मजकूर मर्यादित भागांमधून आपल्या प्रेक्षकांना देण्याबद्दल ओळखल्या जाणार्‍या या ब्रॅंडची ही नवीन मालिका सुद्धा नक्कीच प्रेक्षकांचे रंजन करणारी असेल हे नक्की. देव आणि सोनाक्षीने यापूर्वी प्रेक्षकांना सुसंगतता, समजूतदारपणा, प्रेम, तडजोड, व्यथा, दुरावा आणि पालकत्व अशा नानाविध भाव-भावनांचे दर्शन घडवले आहे. पण, आता या नवीन गोष्टीत हे समजेल की, नात्यांच्या या डोहात खरोखरच प्रेम आहे की त्यात भेग पडली आहे?

कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेत देव आणि सोनाक्षीची भूमिका करणार आहेत, शहीर शेख आणि एरिका फर्नांडिस आणि देवच्या आईच्या म्हणजे ईश्वरीच्या भूमिकेत असेल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर. एका आकंठ प्रेमात असलेल्या जोडप्याच्या जीवनात कालांतराने कसे बदल होत जातात याचा चितार मालिकेत बघायला मिळेल. पुरस्कार विजेता दिग्दर्शक आणि पटकथालेखक नितेश तिवारी या प्रोमोची पटकथा लिहिली आहे. तसेच प्रसिद्ध अॅड फिल्म दिग्दर्शक मनोज पिल्लईने ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी’च्या प्रोमोचे दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -

एक व्यक्तिरेखा म्हणून देव प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता आणि इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांची उत्सुकता आणि अपेक्षा तशाच आहेत ही भावना फार प्रोत्साहक आहे. कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी बद्दल मी खूप उत्साहित आहे. नव्या कथेमधून पुन्हा एकदा देव दीक्षित ही व्यक्तिरेखा साकारण्याची मला उत्सुकता आहे, असे शहीर शेख म्हणालेत.

एरिका फर्नांडिस यांनी या मालिकेबद्दल असे सांगितले की, सोनाक्षी ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळची आहे. आणि मला वाटते, जसजशी ही व्यक्तिरेखा मालिकेत विकसित होत गेली, तशी तशी मीही मोठी झाले. पुन्हा एकदा या कलाकारांबरोबर आणि क्रू सदस्यांबरोबर या नवीन वाटचालीसाठी काम करताना मजा येत आहे. प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम पाहून मी भारावून गेले आहे आणि मी इतकेच सांगेन की, तुमची निराशा होणार नाही. यावेळी, देव आणि सोना हे जरी एकमेकांबरोबर असले तरी त्यांच्यात पूर्वीसारखेच नाते आजही आहे का? आम्ही लवकरच तुम्हाला याचे उत्तर देऊ.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -