लांब केस, सफेद दाडी Shahrukh Khanच्या व्हायरल फोटोमागचं सत्य ऐकून व्हाल हैराण

व्हायरल होत अलेल्या फोटोमध्ये शाहरुखचे लांब केस, सफेद दाडी, व्हाइट शर्ट, ब्लॅक लेझर असा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.

shah rukh khan long hair and beard look goes viral
shah rukh khan long hair and beard look goes viral

Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचे शुटींग करण्यात शाहरुख इतका व्यक्त आहे की ज्यामुळे यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये देखील शाहरुख हजर राहू शकला नाही. दरम्यान शाहरुखचा एका नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुखच्या पठाण सिनेमातील हा त्याचा नवा लुक आहे असा समज सर्वांचा झाला आहे. मात्र हा लूक शाहरुखच्या पठाण सिनेमातील नसून हा त्याच्या एका जुन्या फोटोशूटमधील फोटो असून फोटोसोबत छेडछाड करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

शाहरुखचा व्हायरल होत असलेला फोटो हा २०१७मध्ये डब्बू रत्नानी सोबत केलेल्या फोटोशूटमधील आहे. डब्बूने स्व:ता हा फोटो शेअर केला आहे. डब्बूने शेअर केलेल्या फोटोमध्ये शाहरुख फार हॅडसम दिसतोय. त्याचा ओरिजीनल फोटो फोटोशॉप करुन तो व्हायरल करण्यात आला आहे.  ‘सेक्सी इन नॉट ए शेप इट्स अन अँटिट्यूट बिग लव्ह’ असे कॅप्शन देत शाहरुखचा ओरिजीनल फोटो डब्बूने शेअर केला आहे.

पाहा व्हायरल फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y C O O K (@filmycook)

व्हायरल होत अलेल्या फोटोमध्ये शाहरुखचे लांब केस, सफेद दाडी, व्हाइट शर्ट, ब्लॅक लेझर असा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. शाहरुखच्या केसांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पांढऱ्या झालेल्या दाढीतही तो फार हॅडसम दिसत असल्याच्या प्रतिक्रिया फोटोवर पाहायला मिळत आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले तर शाहरुख लवकरच पठाण या सिनेमात दिसणार आहे. मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुखच्या अनेक प्रोजेक्ट्सचे काम रखडले होते. त्यातील हा एक प्रोजेक्ट आहे. आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुख सोशल मीडियापासूनही अनेक दिवस लांब होता.


हेही वाचा – ‘मेहमूदने माझे करिअर घडवले अन् बिघडवले देखील’, अभिनेत्री Aruna Iraniने केला खुलासा