घर ताज्या घडामोडी 'मेहमूदने माझे करिअर घडवले अन् बिघडवले देखील', अभिनेत्री Aruna Iraniने केला खुलासा

‘मेहमूदने माझे करिअर घडवले अन् बिघडवले देखील’, अभिनेत्री Aruna Iraniने केला खुलासा

Subscribe

१९७१ साली आलेल्या कारवा या सिनेमानंतर मला दोन वर्ष एकही काम मिळाले नाही. कारवा आणि बॉम्बे टू गोवा माझ्या हिट सिनेमांपैकी होते.

Aruna Irani : ८० आणि ९०च्या दशकात दिग्गज अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अरुणा ईराणी. पाच दशकांहून अधिक काळ अरुणा ईराणी सिनेसृष्टीत अँक्टिव्ह आहेत. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. अभिनेता मेहमूदच्या सिनेमात अरुणा ईराणींना खरी ओळख मिळाली. अरुणा ईराणी यांना एक उत्तम अभिनेत्री त्याचप्रमाणे प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. अरुणा ईराणी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव देखील शेअर केला.

- Advertisement -

अरुणा ईराणी मेहमूद यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या, १९७१ साली आलेल्या कारवा या सिनेमानंतर मला दोन वर्ष एकही काम मिळाले नाही. कारवा आणि बॉम्बे टू गोवा माझ्या हिट सिनेमांपैकी होते. या सिनेमानंतर मी मेहमूदसोबत लग्न केले अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मला दोन वर्ष कोणीही काम देत नव्हते.

- Advertisement -

अरुणा ईराणी पुढे म्हणाल्या, दोन वर्षांनंतर मला राज कपूर यांच्या बॉबी सिनेमाची ऑफर आली. मी त्यांची ऑफर स्वीकारली आणि माझ्या भाग्याने तो सिनेमा ब्लॉकबस्टर झाला. बॉबी सिनेमानंतर माझे करिअर योग्य ट्रॅकवर सुरू होते. त्यानंतर मला कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. मी ज्या ज्या भूमिका माझ्यापर्यंत आल्या त्या मी केल्या. मी ही भूमिका करणार नाही असे मी कधीही म्हटले नाही.

मेहमूद यांच्यासोबतच्या नात्याविषयी अरुणा ईराणी म्हणाल्या, मेहमूद आणि माझे लग्न झाले असे सगळ्यांना वाटायचे. त्यामुळे मला सिनेसृष्टीत कोणीही काम देत नव्हते. मला आनंद आहे की मेहमूदने माझे करिअर घडवले आणि आणि त्यानेच माझे करिअर बिघडवले देखील. परंतु त्यानंतर सगळं काही ठिक झाले, मी पुन्हा माझ्या ट्रॅकवर आले. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार सुंदर आणि शानदार होता. त्यांनीच मला अभिनय करायला, कॉमेडी करायला, कॉमेडीचे उत्तम टायमिंग कसे पकडायचे हे शिकवले.


हेही वाचा – Kanganaचा पुन्हा Alia वर निशाणा, म्हणाली पापा की परी …

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -