घरताज्या घडामोडीप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा

Subscribe

भारत सरकारने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. यंदाच्या वर्षी ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री अशा एकूण १०६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेत. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणेंना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. नक्षल प्रभावग्रस्त भागातील युवकांचे पुनर्वसन यासह सामाजिक कारणांसाठी लोकनाट्य कलेचा वापर करण्याच्या योगदानाचा सन्मान म्हणून परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

चिकित्सा (बालरोग) क्षेत्रात ओआरएसचे जनक दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील ८७ वर्षीय डॉक्टरांनी ओआरएसच्या व्यापक वापरासाठी पुढाकार घेतला, ज्यांनी जागतिक स्तरावर ५ कोटींपेक्षा अधिक जणांचा जीव वाचवला आहे.

अंदमान आणि निकोबारमधील जोरबा जमातीमध्ये काम करणाऱ्या रतन चंद्र कार यांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय हिरा बाई लोबी, मुनीश्वीर चंद्र डावर, रामकुई वांगवे न्यूमे, वीपी अप्पकुट्टन पुदुवाल, कपिल देव प्रसाद यांना पद्मश्री देण्यात आला आहे. तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं – 

पद्म विभूषण –

डॉ. दिलीप महलानाबीस (मरणोत्तर), झाकीर हुसेन (कला), एस. एम. कृष्णा (पब्लिक अफेअर्स), बाळकृष्ण दोषी (मरणोत्तर), श्रीनिवास वर्धन, मुलायमसिंह यादव

पद्मभूषण –

एस.एल. भैरप्पा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धार, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जियर, सुमन कल्याणपूर, कपिल कपूर, सुधा मूर्ती, कमलेश दी. पटेल

पद्मश्री –

भिकुजी इदाते, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), डॉ. परशुराम खुणे, डॉ. प्रभाकर मांडे, गजानन माने, रमेश पतंगे, रवीना टंडन, कूमी नरिमन वाडिया

तेलंगणातील ८० वर्षीय भाषाशास्त्राचे प्राध्यापक बी. रामकृष्ण रेड्डी यांना साहित्य आणि शिक्षण (भाषाशास्त्र) क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कांकेर येथील गोंड ट्रायबल वूड कार्वर अजय कुमार मंडावी यांना कला (लाकडावरील कोरीव काम) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पद्म पुरस्कार – देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. १९५४ पासून हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इत्यादी विविध शाखांमधील / क्षेत्रातील योगदानासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’हा पुरस्कार प्रदान केला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’हा पुरस्कार प्रदान केला जातो.


हेही वाचा : सुषमा स्वराज यांच्या एका फोनमुळे पाकिस्तानचा भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लॅन फ्लॉप; अमेरिकन मंत्र्याचा मोठा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -