Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शाहिद कपूर लवकरच 'छत्रपती शिवाजी महाराजां'च्या भूमिकेत झळकणार?

शाहिद कपूर लवकरच ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या भूमिकेत झळकणार?

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा ‘कबीर सिंह’ शाहिद कपूर हा आता प्रेक्षकांना एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिदने ‘जर्सी’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण कले आहे. त्याचा ‘जर्सी’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण संपत नाही तोच शाहिदने ‘राज अॅंड डीके’च्या आगामी वेब सिरिजच्या चित्रिकरणास सुरुवात केली. या माध्यमातून शाहिद आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

‘पद्मावत’ या चित्रपटात शाहिदने महाराजा ‘महारावल रतन सिंग’ची भूमिका साकारली होती. आता शाहिद कपूर आणखी एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकरणार आहे. ‘कबीर सिंह’ या चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जीवनावर चित्रपटसाठी लाइका प्रॉडक्शनसोबत हातमिळवणी केली आहे. व त्यांतील मुख्य भूमिकेसाठी त्यांनी शहिद कपूरला संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अनेक निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची योजना आखली होती. अभिनेता रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.

- Advertisement -

याशिवाय अली अब्बाज जफर हेदेखील सलमान खानला मुख्य भूमिकेत घेवून छत्रपतींच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याची चर्चा आहे. मात्र आतापर्यंत यापैकी कोणताही चित्रपट फ्लोअरवर आलेला नाही. त्यामुळे आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष्य ‘अश्विन वर्दें’ या चित्रपटावर प्रत्यक्षात काम सुरु कधी करणार यावर लागले आहे.


हे वाचा- २१ वर्षानंतर अजय आणि संजय पुन्हा एकत्र, गंगूबाई काठीवाड़ी मध्ये करणार ही भूमिका

- Advertisement -