घरमनोरंजनशाहरुखने मला रात्री 2 वाजता फोन केला...आसामच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीट चर्चेत

शाहरुखने मला रात्री 2 वाजता फोन केला…आसामच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. आसाममध्ये या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. आसाममधील ज्या चित्रपटगृहांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे तिथे तोडफोड करण्यात आली. याचं संदर्भात आसाममधील काही पत्रकारांनी तेथील मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कोण शाहरुख खान असा उलट प्रश्न त्यांना विचारला होता. दरम्यान, त्यानंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एक ट्वीट केलंय, ज्यात त्यांनी रात्री शाहरुखचा त्यांना फोन आल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचं ट्वीट चर्चेत

- Advertisement -

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी लिहिलं ट्वीट करत लिहिलं की, “बॉलिवुड अभिनेते शाहरुख खान यांनी मला रात्री दोन वाजता फोन केला. यावेळी आमच्यात फोनवरून चर्चा झाली. गुवाहाटी येथे त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे म्हणत मी त्यांना आश्वासित केले आहे. आम्ही याबाबत चौकशी करू तसेच आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊ”, असं मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे.

खरंतर, शाहरुखच्या चित्रपटाला देशातील विविध भागांमध्ये विरोध केला जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आसामच्या काही शहरांमध्ये या चित्रपटाविरोधात विरोध दर्शवला जात होता. गुवाहाटीमधील एका चित्रपटगृहात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत चित्रपटाला विरोध दर्शवला होता. यावेळी चित्रपटाचे पोस्टर देखील जाळले होते.

- Advertisement -

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

कोण आहे शाहरुख खान? ‘पठाण’च्या प्रश्नावर आसामच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -