धर्मवीर मधील फोटो शेअर करत प्रसाद ओकने दिल्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा म्हणाला…

नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर अखेर काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली, तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास राजभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदेंच्या दहा दिवसाच्या बंडाचे फळ त्यांना मिळाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सामाजिक , राजकीय, सामान्य जनता तसेच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांकडूनही एकनाथ शिंदेंना अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद ओकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन खास फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिका साकारलेल्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे, तर दुसारा फोटो हा धर्मवीर चित्रपटातील आहे. ज्यात एकनाथ शिंदे मंदिरात देवासमोर हात जोडून उभे असताना दिसत आहेत.

या फोटोंव्यतिरिक्त प्रसाद ओकने फोटो खाली एक कॅप्शन सुद्धा दिलेले आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “मा. मुख्यमंत्री…श्री एकनाथजी शिंदे साहेब…मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!” प्रसाद ओकची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

हे सर्व सस्ता नाट्य सुरू व्हायच्या काही दिवसआधी धर्मवीर आनंद दिघेच्या जीवनावर ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारली होती.


हेही वाचा :सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट… कंगना रनौतने एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा