घरताज्या घडामोडी...तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, राऊतांनी स्पष्टच सांगितलं

…तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

अडीच वर्षांपूर्वीच फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर ते मुख्यमंत्री असते, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असं वातावरण तयार केलं जात आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. अडीच वर्षांपूर्वीच फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर ते आज मुख्यमंत्री असते, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (If he had shown greatness two and a half years ago, Fadnavis would be the Chief Minister today – Sanjay Raut)

हेही वाचा – शपथविधी होताच शिंदे पोहोचले गोव्यात, बंडखोर आमदारांकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत

- Advertisement -

शिवसेना-भाजप युतीदरम्यान अडीच वर्षांचा करार झाला होता. तो करार पाळला असता तर कदाचित आज देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असते, असं संजय राऊत म्हणाले. यामुळे शिवसेना-भाजप यांची युती कायम राहिली असती, असंही राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्याने शिवसैनिकांचा सन्मान झाला का असं पत्रकारांनी विचारलं असता मग नारायण राणेंना का मुख्यमंत्री केले नाही? तेही शिवसेनेतूनच आले होते. नारायण राणेंनाही मुख्यमंत्री केलं असतं तर शिवसैनिकाचा सन्मान केला असं बोललो असतो, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

भाजपकडून सोयीचं राजकारण केलं जातं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम शिंदेंनी केलं. म्हणून मोदी आणि शहांनी त्यांचा सन्मान केला, अशा कडक शब्दांतही राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

शिवसेनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलंय

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद मिळाल्याचं म्हटलं जातंय. मात्र, शिवसेनेकडून याबाबत अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेची सत्ता आली आहे की नाही असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की शिवेसनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलंय असं राऊत म्हणाले. आमचा ठाकरेंच्या नेतृत्त्वार विश्वास असून ठाकरे तिथे शिवसेना हीच भूमिका आम्ही मानतो असं संजय राऊत म्हणाले.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -