कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा… आईच्या सर्जरीनंतर शिल्पा शेट्टीने शेअर केली भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वयाच्या 47 वर्षाची असूनही खूप फिट आणि सुंदर आहे. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असते. शिल्पा सोशल मीडियावर तिच्या फिटनेसबाबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, आता अशातच शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर आपल्या आईबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे शिल्पाचे चाहते देखील भावूक झाले आहेत.

शिल्पा शेट्टीने तिच्या पोस्टमध्ये तिच्या आईचा एक फोटो शेअर करत आईच्या झालेल्या सर्जरीबद्दल सांगताना लिहिलंय की, “पालकांची सर्जरी होताना पाहणं हे मुलांसाठी अजिबात सोप्प नसतं, पण मला माझ्या आईचे अनुकरण करायचे असेल तर ते तिचे धैर्य आणि तिची लढाऊ भावना आहे. गेले काही दिवस माझ्यासाठी खूप चढ-उतारांचे होते. पण माझे हिरो आणि माझ्या हिरोच्या हिरोने तिला वाचवले. शस्त्रक्रियेपूर्वी, त्यादरम्यान आणि नंतर माझ्या आईची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉ. राजीव भागवत यांचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद! माझी आई पूर्णपणे ठीक होईपर्यंत कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा.” असं शिल्पाने लिहिलं आहे.

दरम्यान, शिल्पा शेट्टीचे चाहते कमेंट्समध्ये तिच्या आईसाठी प्रार्थना करत आहेत. त्यातील एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “त्या लवकरात लवकर ठीक होतील, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करु”, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की, शिल्पा तू काळजी नको करु सगळं लवकर ठीक होईल.

 


हेही वाचा : 

कदाचित त्या मला फॉलो करतात… विवाहित अभिनेत्रींबद्दल हेमा मालिनींचे वक्तव्य