घरमनोरंजन...यामुळे 'या' अभिनेत्रीला काम मिळेना

…यामुळे ‘या’ अभिनेत्रीला काम मिळेना

Subscribe

'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या विजेतीला काही कारणामुळे संधी मिळत नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

२०११ ची ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोची विजेती आणि ‘भाभीजी घर पे है’ मधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे ही सध्या चांगल्या कामाच्या शोधात आहे. मात्र, या अभिनेत्रीला सध्या काम मिळत नसल्याचा आरोप तिने केला आहे. ‘चित्रपट आणि टीव्ही कलाकारांच्या संघटनेमुळे मला काम मिळत नाही. तसेच मला चांगली संधी मिळू नये, याची उत्तम खबरदारी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मला चांगले काम मिळत नाही’, असा आरोप शिल्पाने शिंदेने केला आहे.

- Advertisement -

या मालिकेतून मिळाली लोकप्रियता

शिल्पा शिंदेला ‘भाभीजी घर पे है’ या विनोदी मालिकेतून चांगली लोकप्रियता मिळाली होती. मात्र, शिल्पाचा मालिकेच्या निर्मात्यांसोबत खूप मोठा वाद झाला होता. ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेच्या निर्मात्यावर तिने लैंगिक गैरवर्तणूक, मानसिक छळ आणि मानधन अडकवल्याचा आरोप केला होता.

चांगली संधी अजून मिळाली नाही

‘बिग बॉस’ शो जिंकल्यानंतर शिल्पा एका चांगल्या संधीची वाट पाहत होती. तसेच एखादी चांगली संधी मिळावी या शोधात ती होती. मात्र, अद्याप तिच्या वाट्याला चांगली संधी मिळाली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच जोपर्यंत चांगली संधी येत नाही तोपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय शिल्पाने घेतला आहे. शिल्पाला अनेक वेबसीरिजच्याही ऑफर्स येत आहेत. मात्र, सध्या तरी शिल्पाने वेबसीरिजना होकार दिलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – चित्रपटसृष्टीत बलात्कार वैगरे काही होत नाही – शिल्पा शिंदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -