जॉन अब्राहमच्या ‘तेहरान’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'तेहरान' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये त्याचा दमदार लूक पाहायला मिळत आहे

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम अलीकडे त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्यातील त्याचा लूक आणि अंदाज पाहून चाहते खूश झाले होते. याशिवाय त्याने त्याच्या पठान चित्रपटाचं शूटिंग देखील पूर्ण केलं आहे. दरम्यान, आता जॉनच्या ‘तेहरान’ चित्रपटाचं शूटिंग चालू झाले आहे. दिनेश विजान यांच्या या चित्रपटाचं शूटिंग आजपासून सुरू झाले आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील शेअर करण्यात आला आहे.

‘तेहरान’ चित्रपटाचं शूटिंग झालं सुरू

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘तेहरान’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये त्याचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. ही पोस्ट शेअर करत जॉन अब्राहमने लिहिलंय की, प्रजासत्ताक दिन २०२३ साठी तयार राहा, माझा आगामी चित्रपट तेहरान याचं दिग्दर्शन अरूण गोपालन करणार आहेत. जॉन अब्राहमचा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

दरम्यान, अरूण गोपालन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून दिनेश विजान चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच जॉन अब्राहम याआधी अटॅक चित्रपटामध्ये दिसून आला होता. तर येत्या काळात जॉन अब्राहम ‘पठान’, ‘एक व्हिलन रिटर्न’ आणि ‘तेहारान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :अमिताभ बच्चन यांनी घेतलं सायन येथील विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन; फोटो व्हायरल