घरमनोरंजनश्रीदेवी 'लुक अ लाईक'ने उडवली नेटकऱ्यांची झोप, व्हिडीओ व्हायरल

श्रीदेवी ‘लुक अ लाईक’ने उडवली नेटकऱ्यांची झोप, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलीवूडमधील अनेक स्टार्ससारखे हुबेहू दिसणारे कलाकार आपण पाहीले आहेत. यात बिगी बी अमिताभ बच्चनपासून ऋतिक रोशनपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. पण सध्या अशाच एका लूक अ लाईकने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ही आहे दिवंगत लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीची लुक अ लाईक दिपाली चौधरी. या तरुणीचे व्हिडीओ ,फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लाखोंनी त्याला लाईक्स मिळाले आहेत. तर इन्स्टाग्रामवर तिचे ३०.२ हजार फॉलोअर्स आहेत.

दिपाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती ब्लॉगर आहे. नुकताच तिने श्रीदेवीच्या लाडला (१९९४) या चित्रपटातील एका दृश्यावर लिप मिक्सिंग केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने श्रीदेवीची हेअर स्टाईल , इयर रिंग्ज , कपड्यांची स्टाईलही केली आहे. यात ती हुबेहू श्रीदेवी दिसत असल्याने श्रीदेवीचे चाहतेही तिला पसंती देत आहेत.दिपालीचा श्रीदेवी अवतार बघून अनेकांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -