घरमनोरंजनमहाराष्ट्राची लिटिल चॅम्प अडकली लग्नबंधनात

महाराष्ट्राची लिटिल चॅम्प अडकली लग्नबंधनात

Subscribe

'मला तो दिवस आठवतो जेव्हा आठवीत असणारी छोटी कार्तिकी जय जय शिवराय गाण्याचा रियाज करायची. मला विश्वासच बसत नाहीय या मुलीचे आज लग्न झाले आहे, असे म्हणून आर्याने दोघांना शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्राची लाडकी गायिका म्हणजेच कार्तिकी गायकवाड. लिटिल चॅम्स कार्तिकी नुकतीच विवाहबंधनाच अडकली आहे. कार्तिकी गायकवाडच्या नव्या आयुष्याला सुरूवात झाली आहे. लिटिप चॅम्समध्ये कार्तिकीसोबत चाहत्यांना आपल्या आवाजाने घायाळ करणारी तिची मैत्रिण म्हणजेच गायिका आर्या आंबेकरने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या ‘माय प्रिटी गर्ल’ असे म्हणत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘मला तो दिवस आठवतो जेव्हा आठवीत असणारी छोटी कार्तिकी जय जय शिवराय गाण्याचा रियाज करायची. मला विश्वासच बसत नाहीय या मुलीचे आज लग्न झाले आहे, असे म्हणून आर्याने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

कार्तिकीची रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली गेली. जुन महिन्यात कार्तिकी आणि रोनितचा साखरपुडा पार पडला होता. कार्तिकीच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्तिकेचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राच्या मुलाचे स्थळ कार्तिकीसाठी चालून आले. कोणताही विलंन न करता कार्तिकी आणि रोनित यांचा विवाह पार पाडण्यात आला. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वत:चा व्यवसायही आहे.

- Advertisement -

 

‘माझे होणारे सासरे हे माझ्या वडिलांचे जुने मित्र आहेत. पत्रिका बघून कांदेपोह्यांचा कार्यक्रम करून रितसर अरेंज्ड मॅरेज लग्न ठरले आहे. माझ्या सासरी ही कलेची, संगिताची आवड आहे. त्यांना कलेचा आदर आहे. ते स्वत: गात नसले, तरी ते कानसेन आहेत, असे कार्तिकीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.

कार्तिकीने लग्नात लाल रंगाचा घागरा घातला होता. आर्याने कार्तिकी आणि तिचा नवरा रोनित यांच्या लग्नाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. नवरीच्या वेशातली कार्तिकी खूप सुंदर दिसत आहे. कार्तिकी लग्नमंडपात जाण्यासाठी पालखीत बसलेली दिसत आहे. कार्तिकी सारेगमप या मराठी रियलिटी शोची विजेती ठरली होती. त्यानंतर अनेक शोमधून कार्तिकी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचप्रमाणे कार्तिकी निवेदन करताना दिसली होती. अनेक मराठी सिनेमा, मालिकांसाठी कार्तिकी आपले गाणे सादर करत असते.


हेही वाचा – बिग बॉस फेम रश्मीचा हॉट फोटो पाहून तो म्हणाला, ‘तुला अटक होणार!’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -