घरमनोरंजननेहा कक्कडला सतावतोय प्रेमभंगाचा त्रास

नेहा कक्कडला सतावतोय प्रेमभंगाचा त्रास

Subscribe

काही दिवसांपूर्वी नेहा कक्कडचे प्रियकर हिमांशू कोहली सोबतचे असणारे नाते तुटले. ते दोन्ही प्रेमबंधनात होते. त्यांच्या प्रेमाच्या बऱ्याच चर्चा रंगत होत्या. मात्र, अचानक त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्कड विचित्र अशा मनस्थितीतून जात आहे.

प्रेम आणि विरह अनेकांच्या नशिबात येतात. काही लोकांच नातं आयुष्यभर टिकतं तर काहींच काही कारणास्तव आर्ध्यातच तुटतं. नात्यामध्ये वैयक्तिक मतभेदामुळे गाठ निर्माण होते आणि प्रेमभंग होतो. या प्रेमभंगातून काही लोक बाहेर येतात तर काही आयुष्यभर एकाच व्यक्तिसाठी झुरत असतात. ते बाहेर लोकांना कितिही दाखवत असले की, ते मजेत आहे. परंतु, त्यांचे मन आतल्या आतल्या रडत असते. ते आतल्या आत कुडत असतात. यातून बाहेर पडावे यासाठी ते स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीही नैराश्यची एक ज्योत मनाच्या कोपऱ्यात कायम धगधगत असते. अशाच काहीश्या विचित्र परिस्थितीतून सध्या प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड जात आहे.

हेही वाचा – नेहाला ट्रोल करणाऱ्यांवर भडकला हिमांश कोहली

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी नेहा कक्कडचे प्रियकर हिमांशू कोहली सोबतचे असणारे नाते तुटले. ते दोन्ही प्रेमबंधनात होते. त्यांच्या प्रेमाच्या बऱ्याच चर्चा रंगत होत्या. मात्र, अचानक त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्कड विचित्र अशा मनस्थितीतून जात आहे. ती यातून बाहेर पडावे यासाठी स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा देखील प्रयत्न करीत आहेत. विरहाच्या दुखण्यातून बाहेर यावे, यासाठी ती आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर टाकत आहे. ती या फोटोंमध्ये उत्साही दिसत आहे. परंतु, तरीही तिला प्रेमभंगाचा त्रास सतावत असल्याचे जाणवताना दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे काही लिहिले आहे की ते वाचल्यावर लक्षात येईल की तिला विरहचा मानसिक त्रास होत आहे. ती अजूनही त्यामध्ये गुरफटलेली असल्याचे जाणवत आहे.

काय म्हटले आहे नेहाने?

नेहाने आपल्या इन्स्टाग्रामस्टोरीमध्ये लिहिले होते की, ”हो, मी सध्या नैराश्यामध्ये आहे! मला त्रास देणाऱ्या सर्व लोकांची मी आभारी आहे. माझ्या आयुष्यात नैराश्य आणण्यात तुम्ही यशस्वी झालात. अभिनंदन! तुम्ही यशस्वी झालात. माझ्या या परिस्थिततीला फक्त एक किंवा दोन व्यक्ती कारणीभूत नसून जे माझ्या वैयक्तिक आयुष्यात डोकावतात ते देखील या परिस्थितीला कारणीभूत आहेत.” त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यात डोकावणाऱ्या लोकांना नेहाने सांगितले आहे की, कृपया मला सुखात माझं आयुष्य जगू द्या! यानंतर तिने वैयक्तिक आयुष्यत डोकावणाऱ्यांचे देखील आभार मानले. सध्या ती गुहावटी दौऱ्यावर आहे. या पोस्टनंतर तिने लिहिले की, ‘गुहावटीकर चिंता करु नका, मी तुमच्यासाठी बेस्ट परफॉर्मंस करणार!’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -