घरमनोरंजनलंडनमध्ये सोनाली कुलकर्णी करतेय 'डेट भेट'चे शुटिंग

लंडनमध्ये सोनाली कुलकर्णी करतेय ‘डेट भेट’चे शुटिंग

Subscribe

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत दिली माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यावेळी सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यामध्ये चित्रपटसृष्टीदेखील पूर्णतः ठप्प होती. मात्र अनलॉकच्या टप्प्यात पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी पूर्ववत होताना दिसतेय. यादरम्यान अनेक चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी भारताबाहेर देखील करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊननंतर लंडनमध्ये एका मराठी सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हेमंत ढोमे लंडनमध्ये एका मराठी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

- Advertisement -

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत सांगितले की, कोव्हिडच्या लॉकडाऊननंतर पहिलाच चित्रपट शूट करते आहे. माझी तर २०२० मधील पहिली फिल्म आहे आणि वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली. लोकेश विजय गुप्ते या एका अत्यंत हुशार नटाच्या दिग्दर्शनाखाली, माझा आवडता सहकलाकार हेमंत ढोमेसह पुन्हा एक नवी सुरूवात करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

- Advertisement -

सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमेच्या या चित्रपटाच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. सोनाली व हेमंतने या चित्रपटापूर्वी पोश्टर गर्ल या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

नावावरूनच काहीतरी हटके असणाऱ्या ‘डेट भेट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हे कलाकार अभिनय करताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.नावावरूनच काहीतरी हटके असणाऱ्या ‘डेट भेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश गुप्ते यांचे असून अमेय खोपकर, स्वाती खोपकर निर्माता आहेत.


९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ चित्रपटाला नामांकन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -