Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सोनू निगमचे 'सर्किट' चित्रपटामध्ये रोमँटिक गाणं

सोनू निगमचे ‘सर्किट’ चित्रपटामध्ये रोमँटिक गाणं

Subscribe

अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे यांचं “सर्किट” या चित्रपटातलं रोमँटिक गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. “काहीसा बावरतो, काहीसा सावरतो….” असे हलकेफुलके शब्द असलेलं हे गाणं सोनू निगम यांनी गायलं असून, वैभव आणि हृता यांची छान केमिस्ट्री या गाण्यात पहायला मिळते आहे. आजवर अनेक कारणांनी चर्चेत असलेला “सर्किट” हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांचे गीतलेखन, अभिजीत कवठाळकर यांचे सुमधुर संगीत दिग्दर्शन, संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

- Advertisement -

“सर्किट” या चित्रपटाच्या टीझरपासूनच चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. अत्यंत उत्कंठावर्धक कथानक या चित्रपटात असल्याचं टीझरवरून दिसतं. आता चित्रपटाचं रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं आहे. त्यात कॉलेजमध्ये प्रेमात पडणारे प्रेमिक ते लग्नानंतरचे पतीपत्नी असा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे यांची उत्तम केमिस्ट्रीही या गाण्यात दिसते. ताल धरायला लावणारं संगीत, हलके फुलके सहजसोपे शब्द असलेलं हे गाणं नक्कीच लक्षवेधी आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी आता उत्सुकता अधिकच वाढलीय.

- Advertisement -

 


हेही वाचा :

Viral Video : याच्यापुढे खरी चंद्रा पण फिकी… मुलाचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

- Advertisment -