घरताज्या घडामोडीSooryavanshi Box Office Collection: रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ५ दिवसांत...

Sooryavanshi Box Office Collection: रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ५ दिवसांत १०० कोटी पार!

Subscribe

रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कॅफच्या (Katrina Kaif) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा ९वा चित्रपट ठरला आहे, ज्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. याबाबतची माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh) दिली आहे.

तरण आदर्शने ‘सूर्यवंशी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत ट्वीट केले आहे. ”सूर्यवंशी’ पाहण्यासाठी विकेंडला चांगल्या संख्येत प्रेक्षक येत आहेत. चित्रपटाने शुक्रवारी २६.१९ कोटी, शनिवारी २३.८५ कोटी, रविवारी २६.९४ कोटी, सोमवारी १४,५१ कोटी आणि मंगळवारी ११.२२ कोटी रुपये कमाई केली होती. अशा प्रकारे पाच दिवसांत देशात एकूण १०२.८१ कोटी रुपये कमाई केली आहे.’

- Advertisement -

तरण आदर्शने रोहिती शेट्टीबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. तरण आदर्शने सांगितले की, ‘रोहित शेट्टी हिट मशीन आहे. रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ ९वा चित्रपट आहे, ज्याने १०० कोटी कमाई केली आहे. अशा प्रकारे १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सर्वात जास्त चित्रपटाचा रोहितने रेकॉर्ड बनवा आहे. रोहित शेट्टीने फक्त प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला नाही तर त्याच्यामुळे वितरकांच्याही चेहऱ्यावर हास्य आले आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Satyameva Jayate 2: दिलबरनंतर Kusu Kusu नव्या गाण्यातील नोराच्या बेली डान्सने चाहते घायाळ


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -