घरमनोरंजनNew Parliament: रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार हे स्टार्स नवीन संसदेबद्दल ट्वीट...

New Parliament: रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार हे स्टार्स नवीन संसदेबद्दल ट्वीट करत म्हणाले

Subscribe

लोकशाहीच्या नवीन मंदिराची आज प्राण प्रतिष्ठा झाली असून देशाला संसदेची नवी इमारत मिळाली आहे. मंत्रोच्चार आणि संपूर्ण विधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी पूजा करत त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पूर्वीच्या संसद भवनापेक्षा अनेक अर्थांनी नवीन संसद भवन (New Parliament) देशासाठी खास आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एक व्हिडिओ जारी केला होता आणि त्यावर Voice over करण्यास सांगितले होते. यात अनेकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये सेलिब्रिटी आणि सुपरस्टार देखील मागे राहिले नाहीत. शाहरुख खानने व्हिडिओवर आपला Voice over दिला आहे, तर इतर अनेक स्टार्सनी नवीन संसदवर ट्वीट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूबडचा किंग खान शाहरुख खानने देखील नवीन संसदच्या व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हे नवीन घर इतके मोठे आहे की, त्यात प्रत्येक राज्य, प्रदेश, गाव-शहर आणि देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात सामावून घेऊ शकतो. देशातील प्रत्येक जाती धर्मावर प्रेम करता यावे, इतके या घराचे दरवाजे इकते मोठे आहे की, सर्वांना सामावून घेतील. त्याचे डोळे इतके खोल असावेत की, ते देशातील प्रत्येक नागरिक पाहू शकेल. जिथे सत्यमेव जयतेचा नारा ही केवळ घोषणा नसून एक विश्वास असावा. जिथे अशोक चक्राचा हत्ती-घोडा आणि स्तंभ हा केवळ प्रतीक नसून आपला इतिहास आहे. शाहरुखच्या ट्विटला रिट्विट करत पीएम मोदींनी लिहिले की, तुम्ही तुमच्या भावना सुंदर रित्या व्यक्त केल्या. नवीन संसद भवन हे लोकशाही शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक आहे. ते परंपरेला आधुनिकतेशी जोडलेले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, अक्षय कुमारने संसद भवनाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर स्वतःच्या आवाजात Voice over केला आहे. या व्हिडिओसोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “संसदेची ही भव्य नवी इमारत पाहून अभिमान वाटतो.” ते भारताच्या विकास कथेचे प्रतिकात्मक प्रतीक म्हणून कायम राहो. अक्षय कुमारच्या ट्विटला रिट्विट करत पीएम मोदी म्हणाले, तुम्ही तुमचे मत खूप चांगले व्यक्त केले आहे. आपली नवी संसद ही आपल्या लोकशाहीचा प्रकाश स्तंभ आहे. हे देशाचा समृद्ध वारसा आणि भविष्यातील उत्साही आकांक्षा प्रतिबिंबित करते.

- Advertisement -

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील नवीन संसद ट्वीट करत अभिमान व्यक्त केला आहे. रजनीकांत यांच्या ट्विटला रिट्विट केले आहे.

तसेच बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी सुद्धा नवीन संसदबद्दल ट्वीट करत म्हटले की, “ही इमारत केवळ इमारत नाही, हे 140 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांचे ठिकाण आहे. ते त्यांच्या आशेचे प्रतीक आहे, हे हस्ताक्षर त्यांचा स्वाभिमाना आहे, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा जयघोष आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे.”

अशी आहे नवीन संसद

नवीन संसद भवनात लोकसभेत 888 आणि राज्यसभेत 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. संयुक्त बैठक झाल्यास, लोकसभेच्या सभागृहातच 1,280 सदस्य बसू शकतात एवढी क्षमता आहे. इमारतीला तीन मुख्य दरवाजे आहेत. ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी त्यांना नावे देण्यात आली आहेत. व्हीआयपी, खासदार आणि अभ्यागतांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहेत. यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दर्शविणारे एक मोठे आणि भव्य संविधान सभागृह आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -