बॉलिवूड म्हंटलं की अनेक चित्रपट आणि त्याची गाणी ही नव्याने येतच असतात. अशातच काही बॉलिवूडच्या चित्रपटांची यादी आहे. ज्यामध्ये त्या चित्रपटांची काही गाणी कॉपी केली आहेत. तसेच बॉलिवूड हा गाणी कॉपी करण्यासाठी ओळखला जातो. बॉलिवूडच्या काही गाण्याचे बोल, चाल, ट्युनिंग हे सर्व कॉपी थोड्या प्रमाणात कॉपी केलेले आहेत. बॉलिवूड मधली काही गाणी ऐकून असे वाटते अय्य्या हे गाणं कुठेतरी ऐकलं आहे. कारण या गाण्यामध्ये कुठेतरी हॉलिवूडचा ठेका असतो.
अशातच आता कोणती गाणी आहेत जी हॉलिवूड मधली आहेत पणबॉलिवूडमध्ये कॉपी केली जात आहेत. ही बॉलिवूडची गाणी शांतपणे ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल कि कोणती गाणी आहेत जी कॉपी केली आहेत.

धूम मचाले धूम-
‘धूम’ चित्रपटातील धूम मचाले धूम या गाण्याने तेव्हा खळबळ माजवली होती. हे गाणे सर्वत्र ऐकू येत होते. या गाण्यात ईशा देओल तिची जादू दाखवताना दिसत होती. तसेच हे गाणे ज्यावर आपण खूप नाचलो ते खरे तर मुळातच नाही. हे गाणे जेसी कुकच्या ‘मारियो टेक्स अ वॉक’ या गाण्यावरून प्रेरित आहे. जर तुम्ही हे गाणे ऐकले तर तुम्हाला नक्कीच समजेल आणि प्रत्येक वेळी तुम्ही हे कॉपी केलेले हिट गाणे ऐकाल तेव्हा तुम्हाला ओरिजिनल आठवेल.

बुलया-
‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटातील बुलया हे गाणं आहे. या चित्रपटला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण त्यातील गाण्यांनी लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. तसेच या चित्रपटाची सर्व गाणी सगळ्यांच्या आवडची आहेत. विशेषतः बुलया .. हे गाणे लोकांना प्रचंड आवडलं आहे. या गाण्याचे बोल आणि सूर इतके अप्रतिम आहेत की तुम्ही त्यात बुडून जाल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गाण्याचीही कॉपी करण्यात आली आहे. ‘पापा रोच’ या प्रसिद्ध बँडचे ‘लास्ट रिसॉर्ट’ हे गाणे ऐकले तर बुलया आणि हे गाणं सेम वाटेल.

पहली नजर में-
‘पहली नजर में’ या गाण्याने प्रत्येक रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हे गाणं 2008 मधील सर्वात लोकप्रिय गाणे होते. जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणं आहे., ‘रेस’ या चित्रपटातील हे गाणं आहे. तसेच या गाण्याची धून एका कोरियन गाण्यातून सांगण्यात आली आहे. किम ह्योंग सूने गायलेले ‘सारंग ही यो’ हे गाणे ऐका आणि तुम्हाला कळेल की हे गाणं यामधून कॉपी केलेले आहे.

तू ही मेरी शब है-
बॉलीवूड मधल हिट्ट song ‘तू ही मेरी शब है’ या गाण्यावर अनेक युवक फिदा आहेत. हे गाणं ‘गँगस्टर’ या चित्रपटातल आहे. हा चित्रपट देखी छान आहे तशीच याची गाणी देखील खूप छान आहेत. या चित्रपटातील कंगना राणौतच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. पण तु ही मेरी शब है… हे गाणे ऑलिव्हर शांती आणि ‘सेक्रल निर्वाण’ यांनी हे गाणे गायले आहे. त्यांचा या गाण्यातून ‘तू ही मेरी शब है’ हे गाणं घेतल आहे.

स्वैग से करेंगे सबका स्वागत-
भाईजान सलमान खानचे ‘स्वैग से करेंगे सबका स्वागत’ हे गाणे प्रत्येकाच्या आवडीचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का? या गाण्याचीही कॉपी करण्यात आली आहे. हे गाणे, विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केल्याचा दावा केला असला तरी, डीजे कॅचच्या ‘द हॉर्न’ गाण्यावरून हे गाणं उचलण्यात आले आहे. तसेच विशाल-शेखर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, हे गाणे बनवण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला.

- Advertisement -
हेही वाचा :
‘गदर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; नेटकऱ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
- Advertisement -
- Advertisement -