घरमुंबईमुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना- शिंदे गटात राडा

मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना- शिंदे गटात राडा

Subscribe

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा राज्यात मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवस भक्तीभावे बाप्पाची सेवा करत काल अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आहे. मात्र प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला. शिंदे गटाचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले, यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात तुफान घोषणा करण्यात आली. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते हा राडा झाला होता.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच प्रभादेवी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तसेच शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी शांत करण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर ह्या देखील त्याठिकाणी उपस्थित होत्या. मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्वकाही शांततेत होते. तसेच मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे माध्यमांना सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत म्हटले की, परिस्थितीची माहिती घेतली असून पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली जात आहे.


पनवेलमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना, विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -