घरमनोरंजन67th National Film Awards : रजनीकांत 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित, धनुष, मनोज...

67th National Film Awards : रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित, धनुष, मनोज बाजपेयी, कंगनाचाही गौरव

Subscribe

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते शिवाजी राव गायकवाड अर्थात रजनीकांत यांना देशातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिनेसृष्टीतील योगदानासाठी उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते सुपरस्टार रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. उपराष्ट्रपतींनी स्वर्ण कमळ, शॉल आणि रोख स्वरुपातील बक्षीस देऊन रजनीकांत यांचा सन्मान केला. या पुरस्कार सोहळ्यावेळी रजनीकांत यांच्यासह त्यांची पत्नी लता आणि जावई धनुषसोबत दिसला होता. याशिवाय मनोज बाजपेयी, कंगना रनौत आणि धनुष यांनाही उत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी कंगना रनौत आपल्या आई-वडीलांसह पुरस्कार सोहळ्यासाठी पोहचली होती.

- Advertisement -

रजनीकांत यांनी गुरु के. बालाचंदर यांना अर्पण केला पुरस्कार

रजनीकातं यांनी पुरस्कार स्वीकारत आपले मनोगत व्यक्त करत अगदी आपल्या गुरुंपासून ते ड्रायव्हरपर्यंत सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी आपल्या चाहत्यांना, नातेवाईकांना धन्यवाद दिले. आजवरच्या प्रवासात आपल्याला त्यांचा सर्वात मोठा पाठींबा मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या पुरस्कार सोहळ्यावेळी बोलताना रजनीकांत म्हणाले की, मला देशाचा सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ स्वीकारून खूप आनंद झाला असून भारत सरकारचे मी आभार व्यक्त करतो. माझा हा पुरस्कार मी माझे गुरु, मार्गदर्शक के. बालाचंदर यांना अर्पण करत आहे. माझा भाऊ सत्य नारायणराव गायकवाड आणि वडील यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. माझे मित्र, माझा वैयक्तिक वाहन चालक, कलीग राज बहादूर…. बस कंटक्टर ज्याने माझे अभिनयाचे गुण जाणले आणि सिनेमा क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.

याबरोबरच अभिनेत्री कंगना रनौत, मनोज वाजपेयी यांना देखील या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री आणि अभिनेता या पुरस्कांनी गौरविण्यात आले.

- Advertisement -

या कलाकारांना मिळेल पुरस्कार-

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रानौत

अभिनेत्री कंगना रानौतला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ आणि २४ जानेवारी २०२० रोजी रिलीज झालेल्या ‘पंगा’ या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज बाजपेयी

मनोज बाजपेयी यांना ‘भोंसले’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. देवाशीष मखीजा लिखित आणि दिग्दर्शित नाट्य चित्रपटातील मनोज बाजपेयीच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट – एलिफेंट डू रिमेम्बर

स्वाती पांडे दिग्दर्शित ‘एलिफंट दो रिमेम्बर’ ला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. २९ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सुपर डीलक्स’ या तमिळ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यागराजन कुमार राजा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी

अभिनेत्री पल्लवी जोशीला ‘द ताशकंद फाइल्स’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित झाला. ४ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले होते.

इतर पुरस्कारांची यादी 

ऑडियोग्राफी – राधा

ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डीस्ट- रहस

सर्वोत्कृष्ट छायांकन- सविसा सिंह (सोनसी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नॉक नॉक नॉक

सर्वोत्कृष्ट लघू काल्पनिकपट- कस्टडी

सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार – स्मॉल स्केल वॅल्यू

बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल

सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)

सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स

सर्वोत्कृष्ट कौटुंबीक मुल्य असणारा चित्रपट- ओरु पाथिरा

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य – सिक्कीम

सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक – संजय सुरी रचित ‘अ गांधियन अफेयर: इंडियाज क्यूरियस पोरट्रायल ऑफ लव इन सिनेमा’

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक – सोहिनी चट्टोपाध्याय

विशेष उल्लेखणीय – बिर्याणी (मल्याळम), जोनाकी पोरुआ (आसामी), लता भगवान करे (मराठी), पिकासो (मराठी)

सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य- सिक्कीम

सर्वोत्कृष्ट चित्रपट- मारक्कार सिहाम् SIMHAM (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी

नर्गिस दत्त बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार – ताजमहल

सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ

सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – कस्तूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- BAHATTAR HOORAIN (हिंदी)

सर्वोत्कृष्ट छायांकन – जल्लीकट्टू (मल्याळम)

बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह चित्रपट – जक्कल

सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)

सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -