घरमनोरंजनसूर नवा ध्यास नवा: 'सन्मिता धापटे-शिंदेने' पटकावला महागायिकेचा पुरस्कार

सूर नवा ध्यास नवा: ‘सन्मिता धापटे-शिंदेने’ पटकावला महागायिकेचा पुरस्कार

Subscribe

विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून कॅप्टन्सची आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं या गायिकांनी जिंकली. मात्र या १६ पैकी सहा गायिकांनी वैविध्यपूर्ण गाणी सादर करून आपली विशेष छाप सोडली आणि महाअंतिम फेरी गाठली.

मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियालिटी शोचा महाअंतिम सोहळा रविवारी १३ जूनला पार पडला. महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून या स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका ‘सूर नवा ध्यास नवा ‘च्या देदीप्यमान अशा महामंचावर दाखल झाल्या. करोनाच्या या कसोटीच्या परिस्थितीला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठ्या मेहनतीने सजवला, गाजवला आणि अधिकाधिक तेजोमय केला. या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत विजेतीचा पुरस्कार अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे हिने पटकावला आहे. महाराष्ट्राची महागायिका होण्याचा मान सन्मिताला मिळाला आहे. डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत अव्वल स्थान मिळवलं. या सहाजणींना “सूर नवा ध्यास नवा”च्या या मंचावर खऱ्या अर्थानं आपापला ‘सूर नवा’ सापडला. कर्लस मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकांऊटवर महाराष्ट्राच्या महागायिकेची पोस्ट शेअर करत “सन्मिता धापटे-शिंदे’ आहे महाराष्ट्राची ‘आशा उद्याची’. तिचे मनःपूर्वक अभिनंदन!” सन्मिताचं अभिनंदन केलं आहे.

- Advertisement -

“सूर नवा ध्यास नवा”चं हे चौथं म्हणजेच फक्त गायिकांचं पर्व खूपच खास ठरलं. करोनाच्या कसोटीच्या काळात खूप चिकाटीने आणि धैर्याने “सूर नवा”च्या संपूर्ण टीमने अथकपणे हा सुरांचा महायज्ञ सुरू ठेवला आणि रसिकजनांना मनोरंजनाची ही संजीवनी दिली. अवघ्या १६ गायिकांबरोबरच हा प्रवास सुरू झाला परंतु हे सोळाही सूर महाराष्ट्राच्या कानाकानांत, मनामनांत गुंजत राहिले. या गायिकांच्या सुरेल गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं, गायिकांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून कॅप्टन्सची आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं या गायिकांनी जिंकली. मात्र या १६ पैकी सहा गायिकांनी वैविध्यपूर्ण गाणी सादर करून आपली विशेष छाप सोडली आणि महाअंतिम फेरी गाठली.


हे हि वाचा – रेमो डिसूजाच्या आगामी डाँस सिनेमात टायगर-दिशा लावणार ठुमके ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -