घरताज्या घडामोडीSushant Singh Rajput Birth Anniversary: 5 करोड होती सुशांतची फी मात्र...

Sushant Singh Rajput Birth Anniversary: 5 करोड होती सुशांतची फी मात्र ‘या’ सिनेमात केवळ 21 हजारात केलं काम

Subscribe

2013मध्ये आलेला 'काई पो चे' (Kai Po Che) हा सुशांतचा पहिला सिनेमा. त्यानंतर 'पीके', 'शुद्ध देसी रोमांस' आणि 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' या सिनेमात सुशांत दिसला होता. त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या 'एमएस धोन द अनटोल्ड स्टोरी' (MS Dhoni the Untold Story ) हा सिनेमा सुशांतच्या करिअरमधला कर्निंट पॉइंट ठरला.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज वाढदिवस (Sushant Singh Rajput Birth Anniversary)  एमएस.धोनी (MS Dhoni)  छिछोरे (Chhichhore)  पीके (pk) यासारख्या सुपरहीट सिनेमातून सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सुशांतचा जन्म बिहारच्या पटना येथे झाला. पवित्र रिश्ता (Pavitra Rishta)  या प्रसिद्ध मालिकेतून सुशांतने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 14 जून 2020मध्ये सुशांतचा मृत्यू झाला. सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. बिहरहून मुंबईत येऊन सिनेविश्वास करिअर करणाऱ्या सुशांतचा अशाप्रकारे झालेला अंत चटका लावून जाणारा होता.

- Advertisement -

सुशांतने 2013मध्ये त्याच्या सिनेमातील करियरला सुरुवात केली. 2013मध्ये आलेला ‘काई पो चे’ (Kai Po Che) हा सुशांतचा पहिला सिनेमा. त्यानंतर ‘पीके’, ‘शुद्ध देसी रोमांस’ आणि ‘डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी’ या सिनेमात सुशांत दिसला होता. त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या ‘एमएस धोन द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni the Untold Story ) हा सिनेमा सुशांतच्या करिअरमधला कर्निंट पॉइंट ठरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 करोडचे कलेक्शन केले होते.

- Advertisement -

सुशांत सिंह 2017मध्ये ‘राब्ता’ आणि 2018मध्ये ‘केदारनाथ’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. केदारनाथ या सिनेमातून अभिनेत्री सारा अली खानने डेब्यू केला होता. त्यानंतर 2019मध्ये ‘सोनचीडिया’ सिनेमात सुशांत सिंह दिसला. ‘छिछोरे’ हा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाने 150 करोडहून जास्त कलेक्शन केले. अभिनेत्री जॅकलिन सोबत केलेला ‘ड्राइव्ह’ हा सिनेमा देखील सुशांतच्या करिअरमधला दुसरा मोठा सिनेमा होता.

सुशांत सिंह त्यांच्या एका सिनेमासाठी जवळपास 5-7 करोड रुपये मानधन घेत होता. राज कुमार हिरानीच्या पीके सिनेमात सुशांतने केवळ 15 मिनिटांची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमासाठी सुशांतने मानधन नाकारले होते. मात्र तरीही राजकुमार हिरानींने त्याला 21 हजार रुपये शगुन म्हणून दिले होते. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत जवळपास 59 करोड रुपयांचा मालक होता. सुशांतला आकाशातील गोष्टींचे वेड आणि आवड होती. त्याने स्वत: साठी चंद्रावर जमीन देखील खरेदी केली होती.


हेही वाचा – सुशांत सिंह राजपूतच्या टीमने लॉन्च केली वेबसाइट; आता अभिनेते व्यक्त होणार!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -