घरमनोरंजनSushant Singh Rajput death anniversary : सुशांत-अंकिताचे एक रोमॅंटिक गाणे, जे रिलीजचं...

Sushant Singh Rajput death anniversary : सुशांत-अंकिताचे एक रोमॅंटिक गाणे, जे रिलीजचं झाले नाही

Subscribe

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिताचा रोमांस

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाला आज  एक वर्ष पूर्ण झाले तरी चाहते आजही त्याला विसरलेले नाहीत. गेल्या वर्षी १४ जून रोजी मुंबईतील एका फ्लॅटमध्ये सुशांत सिंग राजपूत मृतावस्थेत आढळला. यावेळी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मीडियाच्या माध्यमातून समोर आली. परंतु ही आत्महत्या होती की हत्या याचा तपास अद्याप सुरु आहे. आजही त्याचे कुटुंबिय आणि चाहते सुशांतला न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. यातच आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, अनेक सिलेब्रिटीज आणि चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. याचवेळी सुशांत सिंह राजपूत आणि त्याची एक्स गलफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हीच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

सुशांत अंकिताचे YouTube वर व्हायरल झालेल्या गाण्याला चाहत्यांची पसंती 

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचा हा एक म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील गाणे ‘पवित्र रिश्ता’ या त्यांच्या प्रसिद्ध मालिकेतील आहे. या गाण्यात अंकिता सुशांतसह रोमँटिक अंदाजात दिसतेयं. परंतु हे गाणे इतक्या वर्षात कधीच प्रदर्शित झाले आहे. पण आता सुशांतच्या निधनानंतर या रोमँटिक गाण्याचा व्हिडिओ चाहत्यांसमोर आला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे व्हिडिओ गाणे चाहत्यांना YouTube वर पाहता येऊ शकते.

- Advertisement -

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिताचा रोमांस

या व्हिडिओमध्ये सुशांतसिंग राजपूत आणि अंकिताचा रोमांस चाहत्यांना पाहायला मिळत आहे. परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते सुशांतच्या आठवणीत पुन्हा एकदा भावूक झाले असून त्याची आठवण काढत आहेत. ‘जैसी हो वैसी रहो’ असे या गाण्याचे टायटल आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिता आणि सुशांतच्या या नव्या गाण्याने कल्ला केला आहे. लाखो चाहत्या या गाण्याच्या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

चाहत्यांनी दिला भरभरून प्रतिसाद 

अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंग राजपूत गेली ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही वर्षांपूर्वी अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले. दोघेही ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम करायचे. या मालिकेतील सुशांत आणि अंकिताच्या जोडीला प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेच्या शुटिंगदरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक अवॉर्डस शो, किंवा आउटिंगला दोघे एकत्र दिसयचे.

- Advertisement -

Sanchari Vijay Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय यांचे रस्ते अपघातात निधन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -