घरताज्या घडामोडीसुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण?, नवाब मलिक यांचा सवाल

सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण?, नवाब मलिक यांचा सवाल

Subscribe

सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्येशिवाय आणखी काही आहे का?

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला १ वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे. सुशांतची हत्या नसून आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपने करत सीबीआयची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या एका मंत्र्यावरही आरोप करण्यात आले होते. सीबीआयने चौकशी करुनही अद्याप स्पष्ट कारण दिलं नसल्याने राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा का हे सीबीआयनं सांगितले पाहिजे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी आणि निवडणुक लढवण्यसाठी सीबीआयला पुढे करण्यात आले होते आसा आरोप राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती परंतु निष्पन्न काय झालं असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्येशिवाय आणखी काही आहे का? याची माहिती आजपर्यंत CBI कडून देण्यात आलेली नाही. सुशांतसिंगच्या नावाने भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -