घरताज्या घडामोडी'त्या कामासाठी' रियाला तिच्या वडीलांनी वापरलं, अभद्र कमेंटवर भडकली कुब्रा

‘त्या कामासाठी’ रियाला तिच्या वडीलांनी वापरलं, अभद्र कमेंटवर भडकली कुब्रा

Subscribe

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. यादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती अनेक प्रश्नांच्या जाळ्यात अडकली आहे. रिया चक्रवर्ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. त्यामुळे सध्या सुशांतच्या प्रकरणात रियावर अनेक आरोप केले जात आहेत. सोशल मीडियावर रियाला टीका आणि अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता मधु किश्वर यांनी रिया संदर्भात सोशल मीडियावर अभद्र भाष्य केले होते. ज्यावर सेक्रेड गेम्समधील कुकू म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैत हिने प्रत्युत्तर दिले आहे.

कुब्राने मधु किश्वर यांच्यावर टीका केली आहे. ती म्हणाली की, ‘एक दिवस तुम्ही सकाळी उठल्यावर आरशात पाहता तेव्हा तुमचा लक्षात येत की तुम्ही जे बोललेले आहे ते तुम्हाला आरशात पाहण्याची संमती देत नाही. अशा दिवसाची कल्पना करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुम्ही काय बोलत आहात. जबाबदारपणे बोला नाहीतर सोशल मीडियाचा वापर करणे सोडू द्या.’ सध्या कुब्राचे प्रत्युत्तर देणार ट्विट प्रचंड चर्चेत आले आहे.

- Advertisement -

कुब्राच्या या ट्विटला अनेक सोशल मीडिया युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेले आहे की, ‘एका महिलेला दुसऱ्या महिलेविषयी इतके वाईट बोलण्याचा अधिकार आहे का? तसेच लोक एखाद्या विषयी चौकशी न करता इतके का बोलतात? कारण ते तपास यंत्रणांवर विश्वास ठेवत नाहीत किंवा फक्त ते गॉसिप करणारे आहेत?’ सामाजिक कार्यकर्ता मधु किश्वर यांनी रिया संदर्भात असे ट्विट केले होते की, ‘रिया चक्रवर्तीचे निवृत्त लष्करी अधिकारी वडील हे तिचे लैंगिक आमिष दाखवून श्रीमंत माणसांना पकडण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी करत होते.’

- Advertisement -

सध्या सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत १० सदस्यीय टीम दाखल झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.


हेही वाचा – ‘बॉलिवूड कलाकारांची नार्को टेस्ट केली तर’, कंगणाचे पुन्हा धक्कादायक वक्तव्य!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -