घरमनोरंजनसुशांत सिंह राजपूतचं घर आता चंद्रावर

सुशांत सिंह राजपूतचं घर आता चंद्रावर

Subscribe

सुशांत सिंह राजपूतनं चंद्रावर जागा घेतली असून आता त्या जागेकडे लक्ष ठेवण्यासाठी दुर्बिणही विकत घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतनं चंद्रावर जागा विकत घेतली आहे. चंद्रावरील जागेच्या या भागाचं नाव 'सी ऑफ मसकोवी' असं आहे.

‘मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेन’ हा प्रेयसीसाठी संवाद तर सगळेच ऐकतात. पण जर चंद्रावर कोणी जमीन विकत घेतली तर? वास्तविक बॉलीवूडचे स्टार्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. पण यावेळी चर्चेत आहे तो सुशांत सिंह राजपूत तेही, चंद्रावर घेतलेल्या जागेमुळं. मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतनं चंद्रावर जागा विकत घेतली आहे. चंद्रावरील जागेच्या या भागाचं नाव ‘सी ऑफ मसकोवी’ असं आहे.

चंद्रावर घेतली जागा

सुशांतसिंह राजपूतनं चंद्रावर जागा घेतली असून या जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी एक दुर्बिणदेखील विकत घेतली आहे. या दुर्बिणीनं तो आपल्या जागेवर लक्ष ठेवू शकणार आहे. ‘माझी आई म्हणायची की, आपल्या आयुष्य मी स्वतः लिहिणार आहे आणि आज मी तीच गोष्ट जगतो आहे आणि आता चंद्रावर पोचलो आहे. मी खूप आनंदी आहे.’ असं यासंदर्भात सुशांतनं आपला आनंद व्यक्त केला आहे. ही जागा त्यानं २५ जून रोजी आपल्या नावे खरेदी करून घेतली आहे. काही लोकांच्या मते सुशांतसिंह राजपूतचा लवकरच ‘चंदा मामा दूर के’ हा चित्रपट येत आहे. ज्याची कथा अंतरीक्षावर आधारित असून चित्रपट प्रमोशनसाठी चंद्रावर सुशांतनं ही जमीन विकत घेतली असावी.

- Advertisement -

‘चंदा मामा दूर के’ लवकरच

दिग्दर्शक संजय पुरण सिंह यांच्या ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका आहे. तर यामध्ये माधवनचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शनवर आधारित असून सुशांत यामध्ये अंतरिक्ष यात्रीची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यानं विशिष्ट प्रशिक्षण घेतलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -