स्वरा भास्करने शेअर केली अनोखी निमंत्रण पत्रिका; सोशल मीडियावर होतेय व्हायरल

मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिचा बॉयफ्रेंड फहद अहमदसोबत कोर्ट मॅरेजकरुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. अशातच समोर आलेल्या बातमीनुसार फहद अहमद आणि स्वरा भास्कर त्यांच्या लग्नाची पार्टी देणार आहेत. आता या पार्टीची निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे. जी स्वराच्या कोर्टातील लग्नाप्रमाणेच खास आहे. यासोबत तिने एक खास मॅसेज देखील लिहिला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.

या निमंत्रण पत्रिकेला खूप सुंदर पद्धतीने डिझाईन केलं आहे. यामध्ये शाहरुख खान कनेक्शन देखील पाहायला मिळत आहे आणि हे कार्ड सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

याशिवाय या निमंत्रण पत्रिकेमध्ये एक खास मॅसेज देखील लिहिला आहे ज्यात लिहिलंय की, “कधी कधी आपण कोणत्याही गोष्टीला खूप दूर दूर पर्यंत शोधतो. परंतु ती गोष्ट आपल्या जवळच असते. आम्ही प्रेमाला शोधत होतो, पण मैत्री आधी मिळाली. हे एका विरोधापासून सुरु झालं. जे राजकारणी घटनांसोबत वाढत गेलं. अंधाराच्या क्षणी आम्ही सोबतीने प्रकाश पाहिला आणि एकमेकांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागलो. आम्ही तिरस्करावेळी प्रेम मिळवलं. हो यामध्ये चिंता, अनिश्चितता आणि भीती देखील होती. परंतु विश्वास आणि आशा देखील आहे. आमच्याशी जोडले जा आणि आनंद पसरवा, कारण आम्ही त्या वेडेपणाचा सोहळा साजरा करत आहोत. जो वसंत मार्च 2023 रोजी दिल्लीमध्ये आहे. नक्की या” असं त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहलं आहे. ही पत्रिका स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर देखील केली आहे.

 


हेही वाचा :

विद्या बालनचं बोल्ड फोटोशूट व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल