विद्या बालनचं बोल्ड फोटोशूट व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला तिच्या उत्तम अभिनयामुळे ओळखले जाते. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये विद्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अलीकडे विद्या बालन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. विद्या सोशल मीडियावरुन तिचे नवनवीन फोटो तसेच काही गमतीदार रील्स देखील शेअर करत असते. दरम्यान, आता अशातच विद्या बालनचं एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो काही वेळातच चर्चेचा विषय बनला आहे.

विद्या बालनचं बोल्ड फोटोशूट व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

विद्या बालनने नुतकचं सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीकडून एक बोल्ड फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये तिने कपडे परिधान केले नसून स्वतःसमोर एक वर्तमानपत्र पकडलं आहे. शिवाय ती एका टेबलवर बसली असून तिच्या हातामध्ये कप आहे आणि तिने डोळ्यांवर काळा चष्मा लावला आहे. विद्याचे हे फोटो फोटोग्राफर डब्बूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेकजण विद्याचं कौतुक करु लागले आहेत. अनेकजण विविध कमेंट्स या फोटोखाली करत आहे.

नेटकऱ्यांनी केलं विद्याला ट्रोल

विद्या बालनचं न्यूड फोटोशूट पाहून अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे. एका नेटकऱ्याने या फोटोवर लिहिलंय की, “फोटोशूट करण्याआधी कपडे तरी घालायचे”. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “अडल्ट चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे वाटतं”

दरम्यान, यापूर्वी देखील 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे देखील ट्रोल झाली होती. मात्र, या चित्रपटामुळे विद्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

 


हेही वाचा :

अशी भाषा की ईयरफोन वापरावे लागले, न्यायमूर्तींचा ‘College Romance’ वेबसीरीजवर आक्षेप