घरमनोरंजनVideo: जेठालालने केला बबितासोबत रोमॅण्टिक डान्स; व्हिडिओ व्हायरल

Video: जेठालालने केला बबितासोबत रोमॅण्टिक डान्स; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

बबिताने इंस्टाग्रामवर 'हा' व्हिडीओ शेअर केला असून त्याला तुफान लोकप्रियता मिळताना दिसत आहे.

निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली या भूमिका देखील प्रसिद्ध आहेत. मात्र यापैकी जेठालाल आणि बबिता या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या जवळच्या आहेत. या मालिकेत जेठालाल बबिताला इम्प्रेस करण्यासाठी विविध कारनामे करत असतो. नुकताच सोशल मीडियावर या दोघांच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच चाहत्याच्या मनावर भुरळ घालत आहे. हा व्हिडिओ बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत असून बबिता मालिकेतील सहकलाकारासह रोमॅण्टिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये जेठालाल आणि बबिता ‘निंद चुराई मेरी किसने ओ सनम’ या गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसत असून यामधून त्या दोघांचा रोमॅण्टिक अंदाजात त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

‘तारक मेहता’ या मालिकेच्या सेटवर लवकरच काहीतरी धमाकेदार कार्यक्रम होणार असल्याची शक्यता असून त्यासाठी जेठालाल आणि बबिता डान्सची प्रॅक्टीस करताना दिसत आहेत. मुनमुनने इंस्टाग्रामवर या डान्स प्रॅक्टीसचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्याला तुफान लोकप्रियता मिळताना दिसत आहे.


‘बिग बॉस’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सलमान भडकला; म्हणाला ‘…तर माझ्यावर बहिष्कार टाका’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -