घरमनोरंजन53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून होणार सुरुवात

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून होणार सुरुवात

Subscribe

भारताचा 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी गोव्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. याचे उद्धाटन 20 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. सध्या याची जोरदार तयार सुरु असून या सोहळा गोव्यातील प्रमुख चौकात पणजीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. तसेच गोव्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देखील याठिकाणी उपस्थित राहणार आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच पाच मराठी चित्रपट

- Advertisement -

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील पाच चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यामध्ये विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरकचा ‘शेर शिवराज’, डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’, प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि शेखर रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपट आहेत. तसेच ‘थ्री ऑफ अस’, ‘द स्टोरी टेलर’, ‘मेजर’, ‘सिया’, ‘द कश्मीर फाइल्स’ हे हिंदी चित्रपट देखील दाखवले जातील. तसेच राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत पार पडणार महोत्सव
गोव्यात पार पडणाऱ्या या महोत्सवामध्ये मराठी, हिंदी भाषेसह दाक्षिणात्य चित्रपटांचे खास चित्रीकरण देखील दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव 8 दिवस सुरु असणार आहे. या महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

धोंडी – चंप्याच्या प्रेम कथेचे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -