धमाल मस्तीने सजलेला ‘जुग जुग जियो’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कियारा अडवाणी आणि वरूण धवनचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’चं पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. कियारा अडवाणी आणि वरूण धवन शिवाय या चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर, प्राजक्ता कोळी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करण जौहरचा निर्मीत ‘जुग जुग जियो’ चित्रपट पुढच्या महिन्यातील २४ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

‘जुग जुग जियो’मध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर पहिल्यांदा एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जौहरने नुकताच त्याच्या ‘जुग जुग जियो’च्या मोशन पोस्टला इंस्टग्राम अकाउंटवर शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “या कुटुंबाचा भाग बना! भावना आणि प्रेमाने परिपूर्ण असलेला चित्रपट येत आहे. भेटूया २४ जूनला.” या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच नीतू कपूर आणि अनिल कपूरची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.

कियारा अडवाणीने शेअर केलं पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

चित्रपट ‘जुग जुग जियो’ व्यतिरिक्त कियारा अडवाणी तिच्या ‘भूल-भूलैया २’ चित्रपटामध्ये सुद्धा दिसूण येईल. हा चित्रपट २० मे २०२० रोजी रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :‘पृथ्वीराज’ चित्रपटातील ‘हरिहर’ गाण्याला मराठमोळ्या आदर्श शिंदेचा आवाज