घरमनोरंजनबहुप्रतिक्षीत हॉलिवूड सिनेमा 'ब्लॅक विडो' भारतात लवकरच होणार रिलीज?

बहुप्रतिक्षीत हॉलिवूड सिनेमा ‘ब्लॅक विडो’ भारतात लवकरच होणार रिलीज?

Subscribe

स्कारलेट जोहानसम या अभिनेत्रीने मार्वलच्या सात सिनेमात ब्लॅक विडोची भूमिका साकारली आहे.

हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसनचा (Scarlett Johansson) सिनेमा ‘ब्लॅक विडो’ (‘Black Widow)लवकर रिलीज होणार असल्याचे कळतेय. स्कारलेट या सिनेमात पुन्हा एकदा धमाकेदार भूमिका नताशा रोमनॉफ साकारताना दिसणार आहे. 2010 मध्ये आलेला सिनेमा ‘आयरन मॅन 2’ मधून नताशा उर्फ ब्लॅक विडो हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. गेल्यावेळी नताशा रोमनॉफने 2019 मधील ‘ॲवेंजर एंन्डगेम’ या महत्वपुर्ण सिनेमात देखील सहभाग घेतला होता. आता पुन्हा एकदा ‘ब्लॅक विडो’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. Cate Shortland च्या दिग्दर्शनाअंतर्गत तयार झालेल्या सिनेमा ‘ब्लॅक विडो’ अमेरिकेत 9 जुलैला रिलीज होणार आहे. यासोबतच ओटीटी माध्यम डिज्नी हॉस्टरवर देखील सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ‘ब्लॅक विडो’ हा सुप्रिद्ध सिनेमा रिलीज केला जाणार नाहीये. अशातच तीन महिन्यानंतर कदाचित 8 ऑक्टोंबरला ‘ब्लॅक विडो’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याचे संकेत देण्यात आले आहे. डिज्नी हॉस्टारवर पल्स प्रीमियरवर व्हिडिओ ऑन डिमांड  या ऑप्शनची सुविधा सध्या भारतात उपलब्ध नसल्या कारणामुळे ‘ब्लॅक विडो’ सिनेमा भारतात रिलीज होणार नाहीये.(The much awaited Hollywood movie ‘Black Widow’ to be released in India soon?

 

View this post on Instagram

 

A post shared by Marvel Entertainment (@marvel)

- Advertisement -

स्कारलेट जोहानसम या अभिनेत्रीने मार्वलच्या सात सिनेमात ब्लॅक विडोची भूमिका साकारली आहे. यंदा स्कारलेटला मुख्य भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली आहे. या सिनेमात असॅसिन सोबत एवेंजर्स बणण्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

 

- Advertisement -


हे हि वाचा – ‘देवमाणूस’ मालिकेतील वंदी आत्याचे हॉट-ग्लॅमरस फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत !



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -