घरमनोरंजनत्या 'अनोळखी' गाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल स्माईल

त्या ‘अनोळखी’ गाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल स्माईल

Subscribe

'स्माईल प्लीज' या सिनेमातील 'अनोळखी' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून सुनिधी चौहाने गायले आहे.

मराठीमध्ये सध्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाची चर्चा चालू आहे. या सिनेमाचे ‘अनोळखी’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे मुक्ता बर्वेवर चित्रित झाले असून सुनिधी चौहान गायले आहे. मनाच्या कलहाचे एक समर्पक चित्रण या गाण्यात केले आहे.

आयुष्यात अनपेक्षित संकट येत असतात. या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना आपण अनेकदा हताश आणि एकटे पडतो. मग आपण त्या परिस्थितीत स्वतःशीच अनोळखी होतो आणि स्वतःचा स्वतःशीच प्रवास चालू होतो. या गाण्यामध्ये आलेल्या परिस्थितीवर समर्पक शब्दांत मनात येणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

‘अनोळखी’ हे गाणे रोहन – रोहन यांनी संगीतबद्ध केले असून सुनिधी चौहान यांनी स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात मुक्ता स्वतःचा नवीन स्वरूपात शोध घेण्यासाठी धडपड करत आहे. एका आशेच्या किरणाची वाट बघत असताना हे गाणे चित्रित केले आहे.

या सिनेमात प्रमुख भूमिकेत मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर आहेत. तसेच महत्त्वाच्या भूमिकेत तृप्ती खामकर, सतीश आळेकर हे दिसतील. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा सिनेमा १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -