घरमनोरंजन'कांतारा'मधील 'वराहरूपम' गाणं वापरण्यास न्यायदंडाधिकाऱ्यांकडून मनाई

‘कांतारा’मधील ‘वराहरूपम’ गाणं वापरण्यास न्यायदंडाधिकाऱ्यांकडून मनाई

Subscribe

सध्या कांतारा या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट कन्नड, तेलगू , तामिळ, मल्याळम या दक्षिणेकडील भाष्यांसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झालेला आहे. ‘कांतारा’ ऐन दिवाळीत प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ आणि अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर मात देत आहे. असे असले तरी त्यातील ‘वराहरूपम’ हे गाणे आता संकटात सापडले आहे.

‘वराहरूपम’ हे ‘कांतारा’मधील अतिशय महत्वाचे गाणे आहे, हे आता सर्वांच्याच लक्ष्यात आले आहे. चित्रपटातील महत्वाच्या प्रसंगी हे गाणे अनेकदा चित्रपटात वापरण्यात आले आहे. या गाण्यामुळे त्यातील व्हिज्युअल्स आणि मुख्य म्हणजे क्लायमॅक्स महत्वाचा ठरलेला दिसून येतो. असे असताना जर हे गाणेच चित्रपटातून काढून टाकले तर?… नेमका हाच प्रश्न या ‘कांतारा’तील ‘वराहरूपम’ गाण्याबाबत उद्भवला आहे!

- Advertisement -

केरळमधील ‘Thaikudam Bridge’ या म्युझिक बँडने हा प्रश्न कांताराच्या निर्मात्यांसमोर निर्माण केला असून, त्यांनी थेट कोर्टातच धाव घेतली. त्यांच्या मते ‘कांतारा’ तील वराहरूपम हे गाणं, या बँडच्या ‘ नवरसम’ या ओरिजीनल गाण्याची हुबेहूब नक्कल आहे. या बाबतची एक पोस्टही त्यांनी सोशल मिडियाद्वारे प्रसिद्ध केली होती .

‘Thaikudam Bridge’ ने याबाबत दिलेले कोर्टाचे म्हणणे सुद्धा प्रसिद्ध केले आहे. ‘Thaikudam Bridge’ बँडच्या प्ररवानगीशिवाय हे गाणे चित्रपटात वापरण्यावर कोर्टाने ‘कांतारा’च्या निर्मात्यांना मनाई केली आहे. याबाबत आपल्या नव्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की ,” कोलीकोडचा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, म्युझिक कम्पोजर, युट्यूब, स्पोटिफाय, विंक म्युझिक, जियो सावन आणि संबंधित इतरांना ‘वराहरूपम’ हे गाणे ‘Thaikudam Bridge’ बँडच्या परवानगीशिवाय वापरण्यास मनाई केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

आयुष्यात पावलोपावली करावा लागतो संघर्ष… चिरंजीवीने शेअर केली समंथासाठी भावूक पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -