घरमनोरंजन‘द केरळ स्टोरी’ दाखवण्याऱ्या चित्रपटगृहाला ISIS संघटनेकडून धमकीचा ई-मेल

‘द केरळ स्टोरी’ दाखवण्याऱ्या चित्रपटगृहाला ISIS संघटनेकडून धमकीचा ई-मेल

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 24 दिवस झाले असून केरळ स्टोरी प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटापेक्षा उत्तम कमाई करताना दिसत आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत 225 कोटींची कमाई केली आहे. परंतु अनेक ठिकाणी अजूनही या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून थांबवलं जात आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार, मॉरिशसमध्ये हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात दाखवला जात होता. त्या चित्रपटगृहातील मालकाला ISIS या संघटनेने धमकीचा ई-मेल पाठवून चित्रपटाचे प्रदर्शन ताबडतोब थांबण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मॉरिशस चित्रपटगृहाने ISIS ने पाठवलेला ई-मेल विपुश शाह यांना पाठवला आहे. आम्ही एमसीनेचा नाश करू, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. आम्ही या चित्रपट गृहात बॉम्बस्फोट करणार आहोत आणि उद्या सर्वांना एक चांगला चित्रपट दाखवू. शुक्रवारी जेव्हा ‘द केरळ स्टोरी’ थिएटरमध्ये रंगेल तेव्हा एमसीनेमध्ये बॉम्ब असेल.

- Advertisement -

काय आहे चित्रपटाची कथा?

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनापूर्वी काळाराम मंदिरात देसी लूकमध्ये पोहोचली कृती सेनन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -