Tiger 3: 2023 ला ईदवर येतोय टायगर, सलमान-कतरिनानं शेअर केला फर्स्ट लूक

उठताक्षणी तो 'टायगर ऑलवेज रेडी' असं म्हणतो आणि इथे या सिनेमाचा टीझर संपतो. 1 मिनिट 9 सेकंदांचा हा टीझर सिनेमाची उत्सुकता वाढवण्यात आणि आपल्याला स्क्रीनवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. त्याचप्रमाणे या सिनेमात आपल्याला इमरान हाश्मीसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, असं बोललं जात आहे.

salman khan
salman khan

नवी दिल्लीः सलमान खानचे सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. त्यात त्याच्यासोबत कतरिना कैफ असेल तर मग ‘सोने पे सुहाग’ आहे. कारण कतरिना कैफ आणि विकी कौशलचं नुकतंच लग्न पार पडलं असलं तरीदेखील या आधी सलमान खानसोबत तीच नाव अनेकदा जोडलं गेलंय. असाच एक सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘टायगर 3’ असं या सिनेमाचं नाव असून, या सिनेमाच्या शूटिंगपासूनच या सिनेमाची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. या सिनेमाचा टीझर नुकताच सलमान खान आणि कतरिना कैफने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. त्याचप्रमाणे यशराज फिल्मनेसुद्धा हा टीझर शेअर केला. ‘टायगर आणि झोया परत येत आहेत,’ असं कॅप्शन देत कतरिनाने ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 2023ला हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होईल, अशी अधिकृत घोषणा केली.

या सिनेमाचा टीझर पाहताना सुरुवातीलाच आपल्याला कतरिना एका ऍक्शन गर्लच्या रूपात दिसत असून, ती मुलांना लाथा मारताना दिसतेय. त्याचप्रमाणे ठोसे लगावताना दिसते. खरंतर ती या मुलांना ही अॅक्टिव्हिटी करायला शिकवत असते. त्यानंतर ती जवळच चेहरा झाकून झोपलेल्या सलमान खानला उठवते आणि उठताक्षणी तो ‘टायगर ऑलवेज रेडी’ असं म्हणतो आणि इथे या सिनेमाचा टीझर संपतो. 1 मिनिट 9 सेकंदांचा हा टीझर सिनेमाची उत्सुकता वाढवण्यात आणि आपल्याला स्क्रीनवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. त्याचप्रमाणे या सिनेमात आपल्याला इमरान हाश्मीसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, असं बोललं जात आहे.

या सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या दरम्यान कतरिना कैफ आणि अभिनेता सलमान खान दाखल झाले होते . सलमान खानची एंट्री म्हणजे नेहमीच शिट्ट्या आणि टाळ्यांचा कल्लोळ असतो आणि टीझर पाहता हीच केमिस्ट्री आपल्याला आता या सिनेमातून पाहायला मिळेल, असं दिसत आहे. पुढचं संपूर्ण शूटिंग हे दिल्लीमध्ये पार पडणार आहे. आता सलमान खान आणि कतरिना कैफच्या या जोडीला बिग स्क्रीनवर पाहायला त्याचे चाहते उत्सुक आहेत.


हेही वाचाः ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, विधानमंडळात सोमवारी विधेयक मांडणार- अजित पवार