तिसरी घंटा झाली… मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसं पाठबळ नसल्याने उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी सेलिब्रेशन केले. या सर्व प्रकरणावर अनेक माध्यमातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी बंड केल्यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय पेच निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसं पाठबळ नसल्याने उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी सेलिब्रेशन केले. या सर्व प्रकरणावर अनेक माध्यमातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

नुकतीच सोशल मीडियावर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले मत मांडली आहे. केदार शिंदे अनेकदा वेगवेगळ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.

त्या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी लिहिलंय की, “तिसरी घंटा झाली…पडदा सरकला….नाटक सुरू…Performance तोच!!!!!!”, असे केदार शिंदे यांनी फेसबुक पोटमध्ये लिहिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा जाहीर केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

दरम्यान आता महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड केल्यानंतर सरकार अल्पमतात आले, त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत घेण्याचे आदेश दिले होते. बहुमत चाचणी निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येऊन राजीनामा जाहीर केला.