Sushmita Sen च्या वेब सीरीज Aarya 2 चा ट्रेलर लॉन्च, म्हणाली- ‘शेरनी इज बॅक’

Trailer launch of Sushmita Sen's web series Aarya 2, says- 'sherani is back'
Sushmita Sen च्या वेब सीरीज Aarya 2 चा ट्रेलर लॉन्च, म्हणाली- 'शेरनी इज बॅक'

सुष्मिता सेनच्या ‘आर्या’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रीलीज झाला आहे.पहिल्या सीझनला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि सीझन टू चा ट्रेलर पाहून प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.सीझन टू च्या टीझरमध्ये सुष्मिताची खतरनाक स्टाइल पाहिल्यानंतर आता ट्रेलरही जबरदस्त आहे. ‘आर्या २’चा ट्रेलर रिलीज होताच चाहतेही ‘माझी शेरनी परत आली आहे’ असं म्हणत आहेत. चाहत्यांनी ट्रेलरला पसंती दाखवली असून, सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.ही बहुप्रतिक्षित वेबसीरीज १० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान अभिनेत्री सुष्मिता सेनने  ‘शेरनी इज बॅक’ असं कॅप्शन देत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

‘आर्या 2’ या वेबसिरीजचा टीझरमधील सुष्मिताचा फर्स्ट लूक हा अतिशय खतरनाक दाखवण्यात आला.त्यामुळे तिची भूमिका आक्रमक दिसत आहे. टीझर शेअर करताना आर्याचे वर्णन सिंहिणी असे केले आहे. ही वेब सीरीज डिज़्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिज़्नी+ हॉटस्टार, हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे.

सुष्मिता सेनने ‘आर्या’द्वारे तिचे डिजिटल पदार्पण तसेच अभिनयात पुनरागमन केले आहे. राम माधवानी यांनी या सीरिजद्वारे वेब विश्वात प्रवेश केला, ज्याने याला आणखी खास बनवले आहे. सुष्मिता व्यतिरिक्त, या मालिकेत चंद्रचूर सिंग, नमित दास आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीत आणखी नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.


हे ही वाचा – Salman Khan ने सेलिब्रेट केला वडिल सलीम खान यांचा ८६वा वाढदिवस