कतरिना, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर प्रदर्शित

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान अभिनीत ‘फोन भूत’च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज ‘फोन भूत’चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.

दर्शकांसाठी हा ट्रेलर खरोखरच अनोखा असून, यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर भूत शिकारीचा विशिष्ट भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर जेव्हा जगातील सर्वात सुंदर भूत कतरिना कैफला भेटतात तेव्हा एक भयकारी प्रवास सुरु होतो. ट्रेलरमधील धम्माल पाहताना प्रेक्षकांना एकीकडे कतरिना स्वतःची खिल्ली उडवताना दिसते आणि दुसरीकडे अनेक भयानक अनुभवांदरम्यान देखील हसू येईल.

‘भूल भुलैया 2’ नंतर प्रेक्षकांना ‘फोन भूत’ हा हॉरर कॉमेडीपट पाहायला मिळणार असून प्रेक्षकांनी या मनोरंजक आणि मजेदार शैलीवर प्रचंड प्रेम दाखवले आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, ‘फोन भूत’ हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आहे.

 


हेही वाचा :

संस्कृती बालगुडेची ‘बेभान’ चित्रपटामध्ये एंट्री