घरमनोरंजनवादग्रस्त डान्सर गौतमी पाटीलची आता थेट चित्रपटात एन्ट्री

वादग्रस्त डान्सर गौतमी पाटीलची आता थेट चित्रपटात एन्ट्री

Subscribe

लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करणारी गौतमी पाटील सातत्याने चर्चेत असते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतत अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यानंतर तिला चांगलाच फेम मिळाला. यानंतर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले. गौतमीच्या या  डान्स प्रकरणावर कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक लावणी नृत्यांगणांनी गौतमीवर बंदीची मागणी केली, मात्र गौतमी पाटील आता लवकरचं चित्रपटात एन्ट्री करणार आहे.

गौतमीने आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावले. आजही महाराष्ट्रात तिच्या प्रत्येक कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढतेय. मात्र अनेक लावणी कलाकारांनी तिच्यावर आक्षेप घेतला. अशात गौतमी पाटीलने आता चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. गौतमी पाटील लवकरंच एका चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. घुंगरु असे तिच्या आगामी चित्रपटाचे नावं आहे. त्यामुळे डान्ससह आता गौतमीचा अभिनय देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

- Advertisement -

गौतमीने यासंदर्भात एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा, असं आवाहन गौतमीने केले आहे.

- Advertisement -

लावणीच्या नावाखाली अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचे आरोप गौतमी पाटीलवर झाला. ज्यामुळे ती विशेष चर्चेत आली. गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,ज्यात ती एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, अश्लील हावभाव करत नाचताना दिसतेय. यावरून तिला बरचं ट्रोल करण्यात आलं. दरम्यान गौतमी पाटीलच्या एका लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरीची देखील घटना घडली होती. ज्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ज्यावरून बरंच राजकारणही रंगलं.


बिहारमध्ये वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट; सात मजुरांचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -