घरमनोरंजनJNU Teaser : ‘JNU’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच

JNU Teaser : ‘JNU’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच

Subscribe

बॉलिवूडमध्ये सध्या राष्ट्रवादी विचारधारेला जोड देणाऱ्या चित्रपटांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’पासून ‘द केरला स्टोरी’, ‘आर्टिकल 370’ पर्यंतच्या संवेदनशील विषयांवर चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

अशातच आता आणखी एका वादग्रस्त असलेल्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. देशविरोधी घोषणा, जय श्रीरामचा जयघोष, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होर्डिंग, डाव्यांवर निशाणा साधणारा ‘JNU’चित्रपटाचा टीझर लाँच (JNU movie Official Teaser launch) करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ज्यात भगव्या रंगात भारताचा संपूर्ण नकाशा पाहायला मिळालं अन् हा देशाचा नकाशा एका हातात बंदी असल्यासारखा पकडल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.

- Advertisement -

‘JNU’ च्या टीझर लाँचने चित्रपटाच्या कथेची झलक दिली आहे. ज्यामध्ये निषेधाची दृश्ये, गुन्हेगारी कटाचे आरोप, देशद्रोहाचे आरोप आणि दहशतवाद समर्थक भावनांचे चित्रण करण्यात आले. गेल्या काही वर्षांत देशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात कशाप्रकारे स्टुडंट पॉलिटिक्सच्या नावाखाली देश तोडण्याचा प्रयत्न झाला, कशारीतीने देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, सरकारी यंत्रणांच्या कार्यात कशाप्रकारे अडथळा आणला गेला, धर्म-जात यावरुन किती खालच्या थराच राजकारण झालं हे सगळं या चित्रपटात उलगडण्यात आलं असल्याचं टीझरमधून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

या चित्रपटात रवी किशन, पियूष मिश्रा, रश्मी देसाई, उर्वशी रौतेला, सिद्धार्थ बोडके, सोनाली सहगल, विजय राज आदी कलाकारांच्या भूमिका आहे. तर, विनय शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, प्रतिमा दत्ता यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -