घरमनोरंजनही आशिकी तुटायची नाय

ही आशिकी तुटायची नाय

Subscribe

सचिन पिळगावकरचे मित्र कोण हे सामान्य प्रेक्षकाला जरी विचारले तरी त्यात अशोक सराफ, महेश कोठारे यांच्यापाठोपाठ ज्युनिअर मेहमुद आणि गायक सोनू निगम यांचे नाव घेतले जाईल. सचिन पिळगावकरने बर्‍याचवेळा आपल्या चित्रपटासाठी सोनूला गायला बोलावले आहे. इतकेच काय तर चित्रपटात भूमिकाही करायला भाग पाडलेले आहे. या सचिनचा अशी ही आशिकी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यासाठी पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटात त्याने सर्व गाणी गाऊन सोनू सचिनची ही आशिकी कधी तुटायची नाय याचा प्रत्यय दिलेला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे हा सचिनचा फक्त मित्रच नव्हता तर हक्काचा कलाकार होता. तो आपल्या चित्रपटात असायलाच हवा असे सचिनचे म्हणणे असायचे. अशी ही आशिकी या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने हा ऋणानुबंध जपलेला आहे. लक्ष्मीकांतचा चिरंजीव अभिनय बेर्डे हा चित्रपटाचा मुख्य नायक आहे. या निमित्ताने सोनूने गायिलेली गाणी त्याला पडद्यावर गायला मिळणार आहेत. सचिनने दिग्दर्शनाबरोबर या चित्रपटातील गाण्यांना संगीतही दिलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -