Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन दिग्गज अभिनेते- निर्माते ललित बहल यांचे कोरोनाने निधन

दिग्गज अभिनेते- निर्माते ललित बहल यांचे कोरोनाने निधन

गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे कोरोनाने निधन झाले आहे. आता कोरोनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे.

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत चालली आहे. सिनेसृष्टीतही कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा कहर सुरुच असून बॉलिवूड कलाकारांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र हा कोरोना विषाणू आता बॉलिवूड कलाकारांचा बळी घेत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे कोरोनाने निधन झाले आहे. आता कोरोनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. दिग्गज अभिनेते तथा निर्माते ललित बहल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. २३ एप्रिल रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ललित बहल यांना अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ललित यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना हृदयाच्या समस्या होत्या. त्यात फुफ्फुसामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत होता. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय गंभीर होती. अपोला रुग्णालयात त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. त्यांचा मुलगा दिग्दर्शक कानू बहल याने शुक्रवारी त्यांच्या निधनाची बातमी दिली होती.

पीटीआईशी बोलताना दिग्दर्शक कानू म्हणाले होते की, ‘शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्याला आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास झाला होता आणि त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग देखील झाला होता, ज्यामुळे तिची तब्येत बिघडू लागली. त्याच्या फुफ्फुसात एक संसर्ग होता, तीव्र आरोग्याच्या समस्यांमुळे त्याचे तब्येत आणखीनच खालावली.” ‘बहलने ‘तीतली’ आणि ‘मुक्ति भवन’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी कोरोनाशी लढा देत ललित यांची प्राण ज्योत मालवली आहे. ललित यांनी अफसाने या मालिकेद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी केलेली मेड इन हेवन वेबसिरिज व जजमेंडल हैं क्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनयासोबतच ललित यांनी तपिश, अतिशयांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती.


- Advertisement -

हे वाचा-  कुंभमेळ्यातच श्रवण राठोड यांना कोरोनाने गाठलं होतं, मुलाचा खुलासा

- Advertisement -