विक्की कौशलही दिसला असता ’83’ सिनेमात ; मात्र ऑडिशन होऊनही ‘या’ कारणासाठी दिला नकार

Vicky Kaushal also appeared in the movie '83'; However, despite the audition, he refused for this reason
विक्की कौशलही दिसला असता '83' सिनेमात ; मात्र ऑडिशन होऊनही 'या' कारणासाठी दिला नकार

अभिनेत्री कटरिना कैफ सोबत लग्न केल्यानंतर अभिनेता विक्की कौशल पुन्हा एकदा शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. आता रिलीज होणाऱ्या अनेक चित्रपटांत तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्हाला ठाऊक आहे का ? विक्की कौशलसुद्धा ’83’ या बहुप्रतिक्षित सिनेमात दिसणार होता.ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, विक्की कौशलने ’83’ या सिनेमात मोहिंदर अमरनाथ या रोलसाठी ऑडिशन दिली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनासुद्धा वाटत होते की, विक्की कौशलनेच मोहिंदरची भुमिका करावी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

याकारणामुळे ’83’ सिनेमाचा रोल विक्कीने नाकारला

एका सूत्राने ईटाइम्सला सांगितले की, विक्कीने बहुप्रतिक्षित ’83’ चे ऑडिशन ‘राजी’ सिनेमा रिलीज होण्याअगोदर दिला. जेव्हा ‘राजी’ सिनेमा हिट झाला तेव्हाच विक्की कौशलने कबीर खान चा हा चित्रपट सोडून दिला.कारण त्या सिनेमात त्याला सेकंड लीड चा रोल मिळाला होता.मात्र कबीर खानची इच्छा होती की, विक्की कौशलनेच मोहिंदर अमरनाथची भुमिका करावी.विक्कीने चित्रपट सोडल्यानंतर मोहिंदर अमरनाथ च्या भुमिकेसाठी अभिनेता साकिब सलीम याने साइन केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

चार दिवसांत 54.29 कोटींची कमाई

बहुप्रतिक्षित ’83’ हा सिनेमा २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला.या सिनेमा चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस आला असून, ’83’ चा बॉक्स ऑफीसवर धमाका सुरु आहे. अवघ्या चार दिवसांतच ५४.२९ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.या चित्रपटाला संपूर्ण भारतातून सकारात्मक प्रतिसाद येत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी १२.६४ कोटींची कमाई केली,तर दुसऱ्या दिवशी १६.९५ तर तिसऱ्या दिवशी १७.४१ कोटींची कमाई केली.मात्र सोमवारी सिनेमाने ७.२९कोटींची कमाई केली असून, बॉक्स ऑफीसवर घसरण झाली.

 


हेही वाचा – ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म